खासदार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शहर भाजपा कार्यालयात आनंदोत्सव

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  ता.२२ भारतीय जनता पक्षाचे सुरत (गुजरात) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल येथील भाजपा शहर कार्यालयाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष पै अमृत भोसले यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणूकीतील भारतीय जनता पार्टीचे सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात माघारीच्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने आपले खाते उघडल्याने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या आनंदाप्रित्यर्थ इचलकरंजी शहर कार्यालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बोलताना शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार चारशे पार चा नारा दिला आहे. त्याची सुरुवात  सुरत येथून झाली आहे. याबद्दल आम्हांला खूप आनंद झाला असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्‍चित असल्याचे सांगितले.

यावेळी सरचिटणीस बाळकृष्ण तोतला, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे,विनोद कांकानी, दीपक पाटील अरुण कुंभार, मोहन बनसोडे दीपक कडोलकर, जिलानी टाकवडे, पाटील, राजू भाकरे, अरुण कुंभार, नारायण आपटे,प्रवीण पाटील, प्रमोद काडाप्पा,अली खान, प्रल्हाद सूर्यवंशी, वसंत पोवार, शिवाजी ढवळे, संजय फातले, विष्णू वाळवेकर, गणेश पिसके, शिवाजी सायमोते, सुरेश पाटील- कोरोची अमित जावळे, वसंत पोवार उमाकांत दाभोळे आदी महायुती चे कार्यकर्ते हजर होते.

फोटो

*खासदार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शहर भाजपा कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करताना.*

__________

प्रसिद्धी प्रमुख 

उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post