मतदान जनजागृतीसाठी आयोजित महिला लोककला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 



जी आज बजावेल, मतदानाचे पवित्र कर्तव्य, तीच घडवेल कुटुंबाचे व राष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य -

   सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले


 प्रेस मीडिया लाईव्ह  :      

इचलकरंजी : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने व्हावे यासाठी विविध उपाययोजना करणेत येत आहेत. याकरिता प्रत्येक मतदारसंघात स्वीप समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

    या अनुषंगाने स्वीप समितीच्या वतीने मतदान जनजागृती व्हावी आणि मतदानाचे प्रमाण वाढावे या

उद्देशाने इचलकरंजीच्या लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका गौरी पाटील आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शाळेच्या विद्यार्थीनी यांच्या सहभागाने आज दि.१२ एप्रिल रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे मतदार जागृती *महिला लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे* आयोजन  करणेत आलेले होते. 

    या कार्यक्रमाचा शुभारंभ सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले आणि उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते दिप प्रज्वलन करून करणेत आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी *"जी आज बजावेल मतदानाचे पवित्र कर्तव्य, तीच घडवेल कुटुंबाचे व राष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य"* असे प्रतिपादन करुन महिलांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होणेचे आवाहन केले.

     कार्यक्रमाचा शुभारंभ  ' हिच आमची प्रार्थना,हेच आमचे मागणे' या प्रार्थनेने करणेत आला. या प्रार्थनेमध्ये गायिका गौरी पाटील यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले आणि नोडल अधिकारी आरती खोत यांनी सुद्धा सहभाग घेऊन उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला.

    या सांस्कृतिक कार्यक्रमात अंगणवाडी कबनुर, विक्रमनगर, तांबे माळ, जवाहर नगर, गावभाग कोरोची, केंद्र शाळा क्रमांक ३६,११ आणि २२ , शाळा क्रमांक २७,५६, माई बाल मंदिर, अनंत राव भिडे विद्या मंदिर, बालाजी हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर आदिंनी सहभाग घेतला.

     या प्रसंगी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप निबंधक सदाशिव जाधव, नोडल अधिकारी आरती खोत, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांचेसह इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    

    मिडिया व्यवस्थापन कक्ष

४८ हातकणंगले लोकसभा 

     मतदारसंघ अंतर्गत 

२७९ इचलकरंजी विधानसभा 

           मतदारसंघ

Post a Comment

Previous Post Next Post