ऑनलाईन जुगारावर पोलिसांची मोठी कारवाई..

 पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुकास्पद होत आहे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार यांच्या पथकाने केली कारवाई

प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडघर खाडीपुल येथे स्किलइंडिया गेम.कॉम या नावाचे वेबपेज तयार करून त्या आधारे लोकांची ऑनलाईन फसवणूक करून जुगार, लॉटरी चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून पनवेल शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. येथे ऑनलाईन जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वडघर खाडी पूल येथे असणाऱ्या ऑनलाइन स्किल गेम या नावाखाली आकडे लावून जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्याने बनावट ग्राहक व दोन पंच यांच्यासह सापळा रचून कारवाई केली असता सदर ठिकाणी ऑनलाइन स्किल गेमच्या नावाखाली आकडे लावून जुगार खेळत असल्याबाबत खात्री झाल्याने सदर स्किल गेम या दुकानाचे मालक व चालक यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात लॉटरी रेगुलेशन अॅक्ट 7 (3), 9 (1) जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(1), (अ) 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्या ठिकाणाहून 1. 31,300 रु किमतीचे ऑनलाइन गेमिंग करता असणारे संगणक साहित्य व रोख रक्कम 13,900/- मिळूनआल्याने ते साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 सदर कारवाई सपोनी प्रकाश पवार, पो हवा अमोल पाटील,पो हवा सुधीर पाटील, पोना मिथुन भोसले, पो कॉ विशाल दुधे, पो कॉ अभिजीत गडकरी आदींच्या पथकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post