डॉ. तुषार निकाळजे यांना महात्मा गांधी पुरस्कार....

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

चेन्नई: ई. एस. एन. पब्लिकेशन्स आणि आय.आय.ई.आर.डी.चेन्नई या संस्थांनी पुण्याचे  संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांना महात्मा गांधी पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. दि. 28 एप्रिल 2024 रोजी आय. आय. टी. मद्रास रिसर्च पार्क, चेन्नई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार डॉ. निकाळजे यांना प्रदान करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  रिपब्लिक ऑफ सेचल्सचे कौन्सिल जनरल श्री. एम. शेषा साई यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. निकाळजे यांना प्रदान करण्यात आला . सामाजिक व प्रशासकीय बदलांकरिता उपयुक्त उच्च शिक्षण व संशोधन यामध्ये कार्यरत असलेल्या पुण्याचे डॉ.  निकाळजे यांना हा बहुमान मिळाला आहे. डॉ. निकाळजे   हे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 32 वर्षे   शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नोकरी करीत होते.  बत्तीस वर्षे शासकीय नोकरी करीत असताना डॉ. निकाळजे यांनी उच्च शिक्षण व संशोधन तसेच अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त पुस्तकांचे लेखन व प्रकाशनही केले आहे. दृष्टीहीन विद्यार्थ्यांकरीतादेखील ब्रेल-  इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. निकाळजे आजही संशोधनात्मक कार्यात व्यस्त आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post