पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना सांगली जिल्हा अध्यक्ष सत्वशील पाटील यांचे अकराव्या दिवशी आमरण उपोषण स्थगित

 सांगली जिल्ह्यातील भेसळयुक्त सिंधी विक्री दुकाने त्वरित बंद करावी याआंदोलन स्थगित केलेचे निवेदन  जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेऊन देण्यात आले


प्रेस मीडिया लाईव्ह ;

सांगली जिल्ह्यात 16 ठिकाणी भेसळयुक्त शिंदी विक्रीची आस्थापना तात्काळ बंद करावीत या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सांगली जिल्हाअधिकारी कार्यालया समोर सुरु होते 

या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन सांगली जिल्हाधिकारी डॉ राजा  दयानिधी यांनी अन्न औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त राजाराम सम्रुदे  व राज्य उत्पादन विभाग जिल्हा अधिक्षक प्रदिप पोटे यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने भेसळयुक्त शिंदी विक्री आस्थापनास भेट देऊन तेथील नुमने हाफकिन संस्थे कडे पाठवण्यात आले तर अन्न औषध प्रशासनाने तीन आस्थापना वर छापा टाकून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे असे लेखी पत्र  सोमवार दिनांक 04 / 03/ 2024 रोजी आंदोलन स्थळी येऊन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले सांगली जिल्हा अध्यक्ष शिवश्री सत्वशील पाटील यांना देण्यात आले .

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजाराम सम्रुदे यांनी आंदोलक सत्वशील पाटीला यांना सरबत देऊन आमरण उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली .यावेळी कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष जयसिग कांबळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरक्षक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post