विशेष वृत्त : बिल्डरांच्या सांगण्यावरून वॉर्ड अधिकारी देतात धोकादायक इमारतीची नोटीस



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील  पाटील

 आंतरराष्ट्रीय विमानतळ ,तिसरी महामुंबई असे विविध प्रकल्पामुळे पनवेल शहराचे महत्व वाढले आहे . त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच सिडको चे भूखंड कमी राहिल्याने महाग झालेत तर पनवेल महानगर पालिका हद्दीतील भूखंडाचे भाव हि डोकं वर काढून आहेत त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांना भूखंड विकत घेण्यापेक्षा इमारत पुनर्विकास प्रकल्पाकडे कळ वाढला असल्याने बिल्डर  पनवेल महानगर पालिका  वॉर्ड  अधिकारीयाना हाताशी घेऊन सुस्थितीत असलेल्या इमारतींना धोकादायक ठरवून पुर्नविकास प्रकल आपल्या पदरात पाडण्याचा  मार्ग अवलंबित  आहेत  ,पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कोणतीही पाहणी  न करता धोकादायक इमारत जाहीर करीत असल्यांना सदनिकाधारकांचे धाबे दणालले आहेत .

पनवेल महानगर पालिका हद्दीत शेकडो इमारतीना  वीस  ते तीस वर्षाहून अधिक कालावधी झाला  आहे,त्यापैकी काही इमारतींची दुरावस्था   झाली आहे तर काही इमारती डागडुजीमुळे ठीक झाल्याने त्यांचे  आयुर्मान वाढले आहे .मात्र ज्या इमारती पुनर्विकास केल्यावर अधिक फायदा मिळू शकतो अशा इमारतींवर बांधकाम  व्यावसायिकांचा डोळा असून त्या इमारतीमधील काही  कमिटी सदस्यांना आमिष देऊन  पुर्नविकास प्रकल्पाचा  आग्रह धरून महापालिका आम्ही सांभाळतो असा आदेश वजा ऑफर देऊन प्रकल्प आपल्या पदरात पाडण्यास शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत त्यातच  पनवेल महानगर  पालिकेचे  प्रभाग अधिकारी  हे महापालिकेसाठी काम करीत नसून बिल्डरांसाठी काम करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे बिल्डरांना पुनर्विकासासाठी लागणारी इमारत कोणतीही तपासणी न करता , प्रामाणिक वास्तुविशारद ,अभियंता यांचे प्रमाणपत्र न घेता अभियंत्यांना हि मॅनेज करून इमारत   धोकादायक जाहीर करून  नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत आहेत . एकीकडे बिल्डर हे देणार नाही ते देणार नाही एवढेच वाढीव क्षेत्र देईल तेवढेच क्षेत्र देईल अशातच करा असा दडपशाही मार्ग अवलंबत नागरिकांवर ना घर का ना घाट  का अशी परिस्तिथी महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन करीत आहे . ऐन वेळेला  आणि अचानक इमारत धोकादायक केल्याने नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post