युवक क्रांती दल आयोजित 'वेध लोकसभा निवडणुकीचा' व्याख्यानास प्रतिसाद


इलेक्टोरल बाँडमधून भाजपची दरोडेखोरी : अशोक वानखेडे

गांधी भवन येथे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : युवक क्रांती दलातर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या 'वेध लोकसभा निवडणुकीचा' या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार,दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान गांधी भवन(कोथरूड) येथे झाले . अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी होते.युवक क्रांती दलातर्फे कार्यवाह जांबुवंत मनोहर,मुस्कान परवीन बाबासाहेब,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे यांनी संयोजन केले.

संदिप तापकीर, श्याम तोडकर, डॉ.उर्मिला सप्तर्षी, डॉ प्रविण सप्तर्षी, अन्वर राजन, राजन खान,प्रशांत कोठडीया, राहुल डंबाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

जांबुवंत मनोहर यांनी व्याख्यान आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली.

अशोक वानखेडे म्हणाले, ' देशावर कब्जा घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. भाजप कडून सत्तेचे लोणी खाण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचा वेडेपणा सुरू आहे. देशाला वाचविण्या साठी पुन्हा लढाई लढण्याची गरज आहे. समाजात चाललेला वेडेपणा आपण पुढे होऊन रोखण्याची गरज आहे.

दलीत, मुस्लीम यांना लक्ष्य केले जात आहे. हा संक्रमण काल चालू आहे. जनतेला आपली ताकद ओळखली पाहिजे.२०२४  नंतर बोलण्या, ऐकण्याच्या अवस्थेत आपण राहणार नाही. म्हणून आताच बोलले पाहिजे, आणि लोकशाही, संविधान वाचवले पाहिजे.

उच्चवर्णीय सत्तेत राहावेत, मनुस्मतीप्रमाणे सत्ता चालावी अशी मनिषा बाळगून संविधानावर हल्ला सुरू आहेत.मोदी सरकारने १० वर्षात कर्जाच्या खाईत लोटले आहे. पुलवामा मुद्द्यावर राज्यपाल मलिक यांचा प्रतिवाद मोदी का करु शकत नाहीत? असा प्रश्न वानखेडे यांनी विचारला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप ला पूर्ण अपयश आले आहे. युवकाना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.इलेक्टोरल बाँड मुळे केंद्र सरकार पूर्ण नग्न झाले असून या सरकारने सरकारी यंत्रणांना विरोधकांवर छू करण्यासाठी वापरले आहे. जर तुमचा स्वतःचा परिवार नाही, तर पैशाचा हव्यास कशाला ? देशात दरोडेखोरी का चालली आहे? असे प्रश्नही वानखेडे यांनी विचारले.  काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीत अधिक अपेक्षा आहेत, असेही वानखेडे यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,' लोकसभेला मतदान करताना दोन वेळा चूक झाली आहे. मोदी सरकार ही वेड्या माणसांनी शहाण्या माणसाना केलेली शिक्षा आहे.यावेळी विवेक बुद्धी वापरली पाहिजे. आगामी दोन महिने जनजागरण केले पाहिजे. समाजातील सकारात्मतेने कार्यरत असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि हे क्रूर सरकार घालवले पाहिजे



Post a Comment

Previous Post Next Post