प्रेस मीडिया लाईव्ह :
खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मतदार साक्षरता क्लब आयोजित लोकशाही व युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री तेजस गुजराथी सी.ई.ओ. एम.डी वर्शिफ अर्थ फाउंडेशन, निवडणूक आयोग (SWEEP) सल्लागार, महाराष्ट्र. निवडणुका तसेच निवडणूक प्रक्रियेतील युवकांचे स्थान, लोकशाहीमध्ये युवकांची जबाबदारी, लोकशाही म्हणजे काय? व विद्यार्थ्यांना रोजगार कसे प्राप्त होतील, कौशल्य आधारित शिक्षण पद्धतीची आवश्यकता,बेरोजगारी, मेंटल हेल्थ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवडणूक प्रक्रियेतील सहभागाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय चाकणे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार आणि मतदानाचा महत्त्वाचा रोल आहे. तसेच भारतीय लोकशाही कशी जगात श्रेष्ठ आहे व मतदान न करणे हे पाप आहे असे समजून सर्वांनी जर मतदान केले तर लोकशाही बळकटीकरणास आणखी वाव आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी अल्ताफ पिरजादे मुख्य राज्य संघटक निवडणूक साक्षरता मंडळ महाराष्ट्र यांनी आपल्या मनोगतात टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय नेहमीच सामाजिक कार्यामध्ये तसेच आपली मतदार जनजागृती अभियानातून उत्तम पद्धतीने भूमिका बजावत आहे तसेच मतदार साक्षरता क्लबचे काम उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी स्नेहल खानोलकर पुणे जिल्हा समन्वयक निवडणूक साक्षरता मंडळ तसेच डॉ .सुचेता दळवी, रा.स.यो.कार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महाविद्यालयाचे मतदार साक्षरता क्लबचे नोडल अधिकारी डॉ. निलेश काळे यांनी केले तर आभार डॉ. नागेंद्र जंगम यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतदार साक्षरता क्लबचे सर्व सभासद व राष्ट्रीय सेवा योजना विभाग समिती सदस्य प्रा.मयूर कडणे, डॉ. पद्माकर घुले प्रा. ज्योती वाघमारे, डॉ. तेजस्विनी शेंडे, प्रा.शुभम पटारे ,श्री अमोल अमराव तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित राहिले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.