पेठ वडगाव येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन याचे अवचित्य साधून पोस्टर प्रेझेंटेशनचा कार्येक्रम संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन याचे अवचित्य साधून शनिवार, दिनांक 02/03/2024 रोजी पोस्टर प्रेझेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व आकर्षक असे पोस्टर तयार करून आणले होते. त्याचबरोबर मराठी विषयातील लेखकांची माहिती, कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोकराव माने वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी,पेठवडगाव येथील प्राध्यापिका निगार मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर. एल.होत्या. प्राचार्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. 

प्रमुख पाहुण्या मुजावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स चे परीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.छात्राध्यापकांनीही आपण तयार केलेल्या पोस्टरचे प्रेझेंटेशन अगदी उत्तमरीत्या केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनीही  विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची छात्राध्यापिका शर्वरी करपे यांनी केले. अशाप्रकारे हे पोस्टर प्रेझेंटेशन अगदी उत्तम रित्या पार पडले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक शिरतोडे व्ही.एल.,प्रा.पवार ए.आर.,प्रा.सोरटे एस. के., प्रा. सावंत ए.पी., ग्रंथपाल चौगुले एस. एस., ग्रंथपाल सहाय्यक पाटील पी. व्ही.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड्. प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक, छात्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post