स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पाच गुन्हेगारासह दोन फरारी आरोपी आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या वतीने पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा आणि फरारी आरोपीचा शोध मोहिम हाती घेण्यात आली.यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना भुदरगड ,करवीर ,वडगाव ,आणि कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे 

यात युवराज आनंदा कांबळे(रा.माळभाग ,दुर्गेवाडी) ,बाबासो पुंडलीक पाटील (रा.सांगरुळ,करवीर),कुंतीनाथ आप्पासो चौगुले (रा.आकिवाट ,शिरोळ),सुरेश संभाजी पाटील (रा.वाकरे ) ,रतन लखन नवले व गणेश रतन नवले (दोघे रा.नागोबावाडी ,पेठवडगांव ).व.आप्पा उर्फ सुभाष माने अशी सात जणांची नावे आहेत.हे  सात  जण आपापल्या भागात लपून छपून वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळताच याचा शोध घेऊन अटक केली .तसेच लक्ष्मीपुरी पोलिसांनी  दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले .यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ते सापडत नव्हते.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक अजित गोडबोले यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post