हयातीच्या दाखल्याचे निमित्त करुन पेन्शन धारकांत संभ्रम निर्माण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी.

कोमनमा कर्मचारी संघ (रजि) . कोल्हापूर ,याच्या वतीने आज प्रशासकसो यांना पत्र दिले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यांच्या वारसांना मिळणारी पेन्शन आणि रोजंदारी कर्मचारी यांना वाढ़ केलेला फरकाची रक्क्म न मिळाल्याने आज कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने आज ता.11/03/2024 रोजी 4 वाजे प्रर्यत पेन्शनरच्या खात्यावर पेन्शन जमा करावी .आणि गुरुवारी ता.14/03/2024 प्रर्यत रोजंदारी कर्मचारी  यांना वेतनासोबत फरक मिळावा.नाहीतर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या परिपत्रकात दिला आहे.

  प्रत्येक महिन्या 5 तारखेला होणारी पेन्शन 11 तारीख आली तरी पेन्शन वाल्यांची पेन्शन न झाल्याने  पेन्शनधारकांत असंतोष निर्माण झाला आहे.लेखापाल विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि अकार्यक्षम कामकाजामुळे पेन्शन न झाल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या बेपर्वाईमुळे पेन्शन वाल्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.तरी लवकरात लवकर पेन्शन जमा करून रोजंदारी कर्मचारी यांना वेतनवाढ़ीच्या फरकाची रक्कम मिळावी अशी मागणी ही करण्यात येत आहे.

 शासनाच्या नियमानुसार डिसेबर मध्ये हयातीचे दाखले देणे आवश्यक असताना जानेवारीत ज्यानी हयातीचे दाखले प्राप्त झाले नव्हते त्याची पेन्शन थांबविली होती.पण फ़ेब्रुवारी महिन्यात 170 जणांनी हयातीचे दाखले जमा न करता त्यांना  ग्राह्य धरुन अदा करण्याचे परिपत्रक निघते. ही बाब निदर्शनास आल्याने सर्वाची पेन्शन थांबविल्याचे समजते.

संबंधित विषयास अनुसरून असलेले अधिकारी अशा प्रकारे जाणीवपूर्वक चुकीचे पत्रक तयार करून पाठविल्यामुळे विनाकारण पेन्शनरना वेठीस धरले जात आहे.तरी सदरची बाब गंभीर स्वरुपाची असल्याने संबंधित कामकाजास जबाबदार असणारयां अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 या परिपत्रकावर कोल्हापुर महापालिका कर्मचारी संघ(रजि).कोल्हापूर .अध्यक्ष यांच्या सहीने प्रशासकसो यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post