मोठी बातमी :दामदुपटीचे आमिष दाखवून 250 कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा फसवणूक केलेला अक्षयला अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - " सान्विक हेल्थ" नावाची कंपनी स्थापन करून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात धुमाकुळ घालुन गुंतवणूकदारांना फक्त दीड महिन्यात दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणूक करून दोन वर्षे गायब असलेला अक्षय अनिल कांबळे (वय 34.रा.सादळे, ता.करवीर ) याला एलसीबीच्या पथकाने अटक करून त्याला पुढ़ील तपासासाठी गोकुळ शिरगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



अक्षय यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा 2022 मध्ये शाहुपुरी पोलिस ठाण्यासह मिरज येथेही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तसेच 2023 ला मुरगुड पोलिस ठाण्यासह गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.तो गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.त्याचा ठाव ठिकाणा त्याच्या नातेवाईकांना माहित असूनही ते पोलिसांना माहिती देत नव्हते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला अक्षय सादळे गावात येणार असल्याचं समजल्याने शुक्रवारी रात्री त्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून अक्षय कांबळेला ताब्यात घेऊन अटक केली.तसेच पुढ़ील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेषराज मोरे ,हेड कॉ.बालाजी पाटील आणि अशोक पवार यांनी केला.

   अक्षय याने गुंतवणूकदारांची दिशाभुल करण्यासाठी स्वतःच्या अपहरण झाल्याची तक्रार 31 जानेवारी 2024 रोजी कोडोली पोलिस ठाण्यात दिली होती.यात अनेक जणांनी गुंतवणूक करून अडकले होते.

Post a Comment

Previous Post Next Post