शहरातील चायनीज गाडी व चिकन विक्रेत्यांनी कचरा उघड्यावर किंवा नाल्यात टाकल्यास त्यांच्या गुंन्हा नोंद होणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले :

कोल्हापूर - शहरातील ठिकठिकाणी असणारे चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांनी साठवणूक ठेवलेला कचरा ते रात्रीच्या वेळेस उघडयावर किंवा नाल्यामध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत शहरातील चायनीज गाडी व चिकन विक्रेते यांनी कचरा साठविण्यासाठी डस्टबीन ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे वॉर्ड निहाय पथके ही नेमन्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांकडून सदरचा कचरा उघड्यावर किंवा नाल्यात टाकल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

तरी शहरातील सर्व चायनीय गाडी व चिकन विक्रेत्यांनी आपला कचरा त्यांनी ठेवलेल्या डस्टबीन मध्ये साठवून ठेवावा. हा कचरा ज्यावेळी घंटा गाडी येते तेंव्हा त्यांच्याकडे द्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post