बागल चौकात एका घराला आग लागून प्रापंचिक साहित्य जळुन खाक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- बागलचौकातील शोभेच्या फटाक्यांच्या दारुचा साठा असलेल्या घराला आग लागून फटाक्याच्या स्फोट झाल्याच्या आवाजाने त्या परिसरातील नागरिक जमा झाले.आग लागलेल्या ठिकाणी अग्निशामन दलाचे पाच बंब दाखल होऊन अग्निशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

या परिसरात फटाके विक्रीची चार दुकाने असून  याच बाजूला शाहुमिलकडे जाणारयां मार्गावर कच्चीघरे असून त्यांच्या भिंती एकमेकाला लागून असून या घरापैकी महेश तेवरे यांचे घर असून त्यांच्या घराच्या छतावर प्लास्टिक कागद आणि झावळ्या आहेत.आज सायंकाळी सातच्या सुमारास महेश तेवरे यांच्या घरातुन फटाका  उडाल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक लगबगीने घरा बाहेर आले .तेवरे यांच्या घरातुन महिला आणि मुली घराबाहेर पळत आल्या .काही वेळातच आगीचे लोट छतावर दिसू लागले.आग मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक गोंधळून गेले.शेजारी असलेल्या अपार्टमेंट मधील आणि उपस्थित असलेल्या नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला.मात्र आग वाऱ्यामुळे पसरत गेली.काही वेळातच अग्निशामन दलाचे बंब घटना स्थळी येऊन दोन्ही बाजूनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली.

----------------------------------------

महेश तेवरे हे इव्हेंटचे काम करीत असून शोभेच्या फटाक्याची दारु घरी होती.त्यामुळे आग लागून आगीने रौद्ररुपधारण करून आग पसरत गेली.या वेळी पत्नी ,मुलगी घरातच होत्या.आग लागल्याचे पाहून त्या घरातुन बाहेर पडल्या.स्वतःचे घर आगीत भस्मशात होत असलेले बघून त्यांना अश्रु अनावर झाले.या आगीत त्यांचे प्रापंचिक साहित्य जळुन खाक झाल्याने मोठे नुकसान झालं आहे.

----------------------------------------

स्फोट की शॉर्ट सर्किट ? 

आगीच्या ठिकाणी महानगरपालिकेचे शहर अभियंता  हर्षजित घाटगे यांच्यासह पथक दाखल होऊन चौकशी केली असता फटाक्याची दारु भरताना स्फोट झाल्याची माहिती मिळाली.त्यांनी पंचनामा करण्याच्या सूचना पथकास दिल्या.मात्र ही आग शॉर्ट सर्किटने   लागल्याची माहिती घरातल्या महिलांनी दिली.मात्र ही आग कशी लागली याची नोंद रात्री उशिराप्रर्यत अग्निशामन दलात झाली नव्हती.

Post a Comment

Previous Post Next Post