बैलगाडीच्या शर्यतीचा स्टेटस ठेवल्याच्या कारणातुन दोन गटात हाणामारी.

  वडणगे येथील घटना , तिघेजण गंभीर जखमी तर 9 जणांच्यावर गुन्हा दाखल.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- करवीर तालुक्यातील वडणगे येथे महाशिवरात्रीच्या निमीत्ताने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून बक्षीसाचा वाद होऊन त्यातच एका गटाने बैलगाडी शर्यतीचा स्टेटस ठेवल्याच्या कारणातुन सोमवारी रात्री दोन गटात लोखंडी गज आणि काठ्याचा वापर करून एकमेकांच्यात जोरदार हाणामारी होऊन यात तिघेजण गंभीर जखमी होऊन या हल्ल्यात काही दुचाकीची तोडफोड करून मोठे नुकसान झालं आहे.

या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करून सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील एका गटाने बाहेरच्या  तरुणांना बोलवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.रात्रीच्या सुमारास स्वीट मार्टच्या दारात हर्षवर्धन शिवाजी पाटील याला तुला आता जिवंत ठेवणार नाही असे म्हणत बाबासो शेलार यांने लोखंडी गज घेऊन हल्ला करून हर्षवर्धन याला गंभीर जखमी केले.या नंतर ऋषीकेश अनिल ठाणेकर यांने धैर्यशील संजय पाटील यांच्या डोक्यात लोंखंडी  गज मारुन गंभीर जखमी होऊन बेशुध्द होऊन पडला.जखमीना उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी दारात असलेल्या दुचाकी फोडुन जौदाळ यांच्या घराचेही नुकसान केले आहे.या घटनेची माहिती करवीर पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळी पोचल्यावर हल्लेखोर पसार झाले.संशयीताची धरपकड सुरु होती.करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post