एक लाख रुपये थकबाकी असलेल्या मिळकत धारकांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार:-आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे



प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मिळकत धारकांच्या थकित घरफाळा वसूली साठी विशेष प्रयत्न करणेत येत आहेत.यासाठी संपूर्ण शहरासाठी पाच वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पथकाकडूनवॉर्ड निहाय थकबाकी दारांच्या घरी जाऊन थकबाकी वसुली साठी प्रयत्न केले जात आहेत. तरी सुद्धा काही मिळकत धारक आपली घरपाला पाणीपट्टी थकबाकी भरण्यास सहकार्य करीत नाहीत. हि बाब आज शुक्रवार दि. २२ मार्च रोजीच्या आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचे निदर्शनास आलेने पहिल्या टप्प्यात आयुक्त यांनी

शहरातील १ लाख रुपये पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकी दारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचे सक्त आदेश कर विभागास दिले.

त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात थकबाकी दारांचे पाणी कनेक्शन कट करणे आणि सदर मिळकत सिल करणेची कारवाई करणेचे आदेश सुद्धा या बैठकीत दिले.

    यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वसुली साठी नियुक्त पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


      

Post a Comment

Previous Post Next Post