नण्ंदेचे 9 तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्या भावजला तिच्या साथीदारासह अटक

  5 लाख 11 हजार किमंतीचा मुद्देमाल जप्त .

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापुर-शिवाजी पेठ परिसरात असलेलल्या राहुल हॉटेल शेजारी रहात असलेल्या सौ.रुपाली सौरभ पिंजरे (वय 29)यांच्या घरात चोरी करणारी नात्याने त्यांची भावजय असणारी अंवती शैलेश शिंदे (वय 33.रा.रविवार पेठ,को).आणि तिचा साथीदार विशाल विष्णुपंत शिंदे  (वय 38.रा.सोनटक्के तालीम.को).या दोघांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून 5 लाख 11 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,वरील पत्यावर रहात असलेल्या सौ.रुपाली सौरभ शिंदे हे आपल्या कुंटुबियासमवेत एकत्रितपणे रहात असून त्यांच्या घरात 06/01/2024रोजी लग्न कार्य असल्याने पै पाहुण्याची वर्दळ होती.या दरम्यान त्यांच्या खोलीतील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले असता त्यानी या बाबतची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास चालू केला.जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक तपास करीत असताना या पथकास गुजरी येथे एक इसम 11/03/2024 रोजी दागिने विक्री करण्यास येणार असल्याचे समजले.त्या नुसार त्या परिसरात पाळत ठेवली असता एक इसम संशयास्पद फिरत असताना दिसला त्याला पोलिसांनी ताब्यात  चौकशी केली असता त्याच्याकडे सोन्याची एक बांगडी सापडली असता या बागडी बाबत चौकशी केली असता त्याने समाधान कारक उत्तरे दिली नसल्याने अधिक चौकशी केली असता ही बांगडी ओळख असलेली अंवती शिंदे हिने  एक महिन्यापूर्वी तिच्या माहेरच्या नण्ंदेच्या घरी चोरीतील दागिन्या पैकी एक ही बांगडी असून माझ्याकडे विक्री साठी दिल्याचे सांगितले असता ती बांगडी जप्त करून अटक केली.त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या महिलेचा शोध घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उतरे देण्याचा प्रयत्न केला.महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली देऊन घरी लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने जप्त करून पोलिसांनी तिला अटक केली.

  ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  संजीव झाडे आणि गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post