शिक्षक भरतीसाठी 'आम आदमी पक्षाने' केलेल्या आंदोलनास दैदिप्यमान यश

_अभियोग्यताधारक भावी शिक्षकांनी मानले आम आदमी पक्षाचे आभार._

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेस सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुहूर्त लाभला. संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल द्वारे होणार असून *२२ हजार* शिक्षक पद भरती पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदांसह महानगरपालिका, नगरपालिका खाजगी शाळांच्या जाहिराती पवित्र पोर्टल  वर दिसत आहेत.लवकरच अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांकडून प्राधान्यक्रम भरून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रात सुमारे १४ वर्षानंतर मोठी शिक्षक भरती होत असूनअनेक अडचणींमधून शिक्षक भरतीस मुहूर्त लागला आहे. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात परीक्षा घेतली होती. मराठी इंग्रजी माध्यम वाद , केंद्र शाळेवर साधन व्यक्ती नियुक्तीचा वाद अशा एक ना अनेक कारणांमुळे पदभरतीस झालेला हा विलंब बघता पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी पुण्यात येऊन आयुक्त कार्यालया समोर बसून होते. विद्यार्थ्यांकडून  निषेध दर्शवत पंधरा दिवसाचे आंदोलन करण्यात आले होते. तरीही हा तिढा सुटत नसल्याचे पाहून आम आदमी पक्षाने शिक्षक भरती यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेत *शहराध्यक्ष मा.सुदर्शन जगदाळे* यांच्या मार्गदर्शनात आणि *शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्ष शितल कांडेलकर* _यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाला निवेदन देत पाठपुरावा केला. शिक्षक भरतीसाठी असलेल्या आपल्या मागण्या आयुक्तांसमोर ठेवल्यात. अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांना आयुक्त दालनात बैठक करुन आपल्या मागण्या पूर्ण करून द्याव्यात म्हणून शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासोबत वारंवार सुसंवाद घडवून दिला._ तसेच *तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात आले.* आंदोलनाचे स्वरूप आगळे वेगळे, लक्षवेधी असून राष्ट्राचे भवितव्य दर्शवत होते.

'आप' च्या मागण्या पूर्ण

* _मराठी व इंग्रजी माध्यमास योग्य न्याय मिळाला._

* _इंग्रजी व मराठी माध्यम वादामुळे साधन व्यक्ती या पदास तूर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे._

* _६७ हजार शिक्षक पद भरती पैकी वित्त विभागाने मान्य केलेल्या ८०% शिक्षक पद भरती जागा दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे._

* _२२ हजार पद भरती चा पहिला टप्पा सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पवित्र पोर्टलवर जाहिराती द्वारे प्रसिद्ध झाला._

* _उर्वरित शिक्षक पदभरती एप्रिल किंवा मे २०२४ या दरम्यान पूर्ण होणार._

* _निवडणूक आचारसंहिते पूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार._

शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य 

महत्त्वाचे असे की १४ वर्षानंतर होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेकडे आम आदमी पक्षाच्या 'शिक्षक आघाडीचे पूर्ण लक्ष असून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यत हलचालींचा  पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थी व शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी आप शिक्षक आघाडी नेहमीच सतर्क व पठिशी राहील.

शितल कांडेलकर 'आप'

 शिक्षक आघाडी शहराध्यक्ष. 

या यशस्वी भरती प्रक्रियेत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत होते. सक्रिय सहभाग असलेले आप सहकारी: आम आदमी पक्ष पुणे शहर अध्यक्ष मा. सुदर्शन जगदाळे व त्यांच्या मार्गदर्शनात आणि शितल  कांडेलकर शहराध्यक्ष 'शिक्षक आघाडी' पुणे शहर, यांच्या कुशल नेतृत्वात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सेंट्रल बिल्डिंग येथे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आम आदमी पक्षाचे  अक्षय शिंदे, सतीश यादव,धनंजय बेनकर,सुरेखा भोसले,अमित म्हस्के,निरंजन अडागळे, किरण कद्रे, ॲड.अमोल काळे, पूजा वाघमारे, किरण कांबळे, शाहीन आत्तार, अनिश वर्गीस,ॲन अनिश, अंजली इंगळे, श्रद्धा शेट्टी, मनोज थोरात, प्रशांत कांबळे, रामभाऊ इंगळे, मिलिंद सरोदे, संतोष काळे, अविनाश भाकरे, अख्तर, रवींद्र पाडाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय कटारनवरे, हरीश चौधरी, खुशबू अन्सारी, संजय कोने, बळीराम शहाणे,कुमार धोंगडे, बापू रगसिंग,उत्तम वडवराव, सुरज सोनवणे, अभिजीत गायकवाड इ. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

Previous Post Next Post