पुणे : सुफी संत हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहाब किबला ( र हे ) यांचा उरुस उत्साहात संपन्न झाला


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सुफी संत  हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहाब किबला ( र हे ) यांचा उरुस नुकताच अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद, दुल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला. उरुसाचे हे 8 वे वर्ष होते. 

सायंकाळी सहा नंतर सुफी संत  हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह  (रहे) यांच्या मजार शरीफ वर गिलाफ  चादर,  चढवण्यात आली त्या नंतर  हजरत यांचे वारसदार जान शिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह) यांनी फातिहा देऊन सलाम पढून उपस्थित सर्वांसाठी दुवाँ व प्रार्थना केली.  या नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  भोजना नंतर हज़रत यांचे वारसदार व जानशिन) मौलाना शाह नजीरुद्दीन (उर्फ मख्तुमी शाह) यांचा  विशेष बयान ठेवण्यात आले होते.

या वेळी बयान व महिफिले समाचा कार्येक्रम  कॅम्प येथील विरवानी प्लाझा  येथे ठेवण्यात आला होता.







प्रथम फूलपान  करण्यात आले : 

हजरत यांचे बायान सुरू होण्याअगोदर महाराष्ट्र  मुस्लिम फ्रंट चे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी  हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)  यांचा फुलपान करून सन्मान केला, तर हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)  यांनी महाराष्ट्र  मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांचा फुल पान करून सन्मान केला. .फूल पान नंतर प्रथम नाथ गाऊन बयान चा कार्येक्रम सुरू करण्यात आला, 

 हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)  यांनी आपल्या बयानं  मध्ये गुरू आणि शिष्य यांचे नाते कसे असावे याची विशेष व महत्वाची  माहिती उपस्थितांना दिली.  या नंतर  महिफीले समाचा  जोरदार व रंगतदार कार्येक्रम झाला. या नंतर सर्वांसाठी  दुवा करून सलाम पढून कार्येक्रमाची सांगता झाली. 

सुफी संत  हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह  (रहे)  यांच्या उरुसा साठी  मुंबई , बारामती , सोलापूर , सांगोला या ठिकाणाहून  सुफी संत  हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह  (रहे) यांचे शिष्य, खलीफा हजर होते . या ऊरसाचे संपूर्ण नियोजन हज़रत यांचे वारसदार व जानशिन) मौलाना शाह नजीरुद्दीन (उर्फ मख्तुमी शाह) यांचे मार्फतच केले जाते. विशेष करुन त्यांचे प्रमुख महागुरुमौलांना गौसवी शाह सहाब (हैद्राबाद) यांचे पूर्व परवानगी ने व त्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात.

सदर उरुसाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाह नजीरुद्दीन उर्फ मख्तुमी शाह यांचे बंधु शाह मोईनुद्दीन , शाह हबीबउद्दीन  , शाह सुलतान शेख, हजरत यांचे खलिफा व शिष्य यांनी परिश्रम घेतले या उरुसाच्या कार्यक्रमास पुणे शहरातील पत्रकार,  व समाजसेवकांचा व हजरत यांचा भक्तांची ही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post