अतिग्रे येथे पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेस सुरुवात



प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी :  भरत शिंदे

अतिग्रे तालुका हातकणंगले येथे पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांच्या मार्गदर्शनानुसार या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे . 



मजले येथे पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भात दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी तीन दिवसाचे ट्रेनिंग होते ते अतिग्रे सरपंच उपसरपंच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी ट्रेनिंग पूर्ण केले  त्या ट्रेनिंग मधील जे मार्गदर्शन मिळाले त्यानुसार गतवर्षी पाऊस पर्जन्यमान कमी झाल्यामुळे अतिग्रे गावचा  असणारा तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे व शेतीसाठी असणारे विहिरीत पाणी कमी पडत असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत चाललेले आहे तसेच गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चाललेला आहे 

हे हे सर्व लक्षात घेता अतिग्रे गावचे लोक नियुक्त सरपंच  यांनी 4 फेब्रुवारी 2024 पासून अतिग्रे गावातील सामाजिक कार्यकर्ते व रिटायर्ड मोजणी सर्वेअर माननीय श्री बाबासाहेब शिंदे व  उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन प्रथमता अतिग्रे येथे असणारे डोंगर त्याचे शिवार पहाणी पहाटे सहा वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत जवळपास तीन तास असे पाच दिवसांमध्ये शिवार पाहणी पूर्ण केली त्यानंतर डोंगर पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत जवळपास वीस बंधारे, चरी   पाडणे , खड्डे खोदणे हे गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने व श्रमदानातून करण्यात आलेले आहेत दररोज सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यकर्ते श्रमदानातून चार ते पाच बंधारे बांधणे अशी कामे केले जातात 

   या उपक्रमासाठी अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड, उपसरपंच श्री बाबासो पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे ,सदस्य भगवान पाटील ,अनिरुद्ध कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे, धुळोबा पाटील ,उत्तम पाटील, अमर पाटील, विश्वास पाटील, कृष्णात पाटील, प्रदीप पाटील ,शिवाजी पाटील ,दादासो पाटील ,माजी सरपंच प्रशांत गुरव, सचिन पाटील सर, लखन पाटील ,ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे, राम पाटील संजय चौगुले, सुहास पाटील, अजित पाटील ,निलेश पाटील , सुजित पाटील , संकेत पाटील, भरत शिंदे यांनी जवळपास सात ते आठ दिवस रोज सकाळी पहाटे सहा ते नऊ वाजेपर्यंत श्रमदानातून बंधारे बांधणे, चरी पाडणे ,खड्डे काढणे अशा कामात सुरुवात केलेली आहे माननीय सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सांगण्यानुसार या उपक्रमास नाम फाउंडेशन व शासनाची मदत व्हावी असे सांगण्यात आले

   ""  विशेष करून या पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमामध्ये अतिग्रे येथे असणारे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री बाबासाहेब कापसे हे स्वतः त्याबाबत सक्रिय असून दररोज सकाळी पहाटे येऊन श्रमदान करतात ""

   

Post a Comment

Previous Post Next Post