झुंडशाही - गुंडशाही - भ्रष्टाचारा विरोधात शिवसेनेची निषेधात्मक सह्यांची मोहीम



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या झुंडशाही गुंडशाही विरुद्ध सह्यांची निषेध मोहीम शनिपार चौक येथे घेण्यात आली ,यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत महाराष्ट्रात अशांतता पसरवू पाहणाऱ्या नितेश राणे ला अटक करा अशी  मागणी केली ,



भाजपचा वाचाळवीर नितेश राणे याने सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय कोणी काही करू शकत नाही " ह्या वक्तव्यामुळेच ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करायचे धाडस  झाले , अनेक गुन्हेगार मंत्रालयापर्यंत , मुख्यमंत्री घेऊन फिरत आहेत , पुणे शहरात उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदार ने पोलीस शिपायास कानाखाली मारली, तसेच  पुणे शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यावर गृहमंत्री सपशेल फेल झाले आहे . 

महाराष्ट्र सरकारचे काम चुकीचे चालले आहे , आणि नागरिकांच्या भावना सरकारच्या विरोधात तीव्र उमटल्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आज सह्यांची मोहीम घेण्यात आली .

महिला आघाडीच्या वतीने बांगड्यांचा आहेर सह्यांच्या फलकावर लाऊन निषेध नोंदविण्यात आला . 

यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणले महाराष्ट्रात वाढलेली गुंडशाही, झुंडशाही,  आणि भ्रष्टाचार या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांना यात सहभागी करून घेतल्यामुळे नागरिक उस्फुर्त व्यक्त झाले त्यांचा मनातील खदखद व्यक्त झाली .

यावेळी उपस्थित शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, प्रशांत राणे , भरत कुंभारकर,  प्रशांत बधे, राजेश पळसकर, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत ,काँग्रेस नेते मोहन जोशी ,   राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम , शांतीलाल सुरतवाला , शिवसेनेचे नंदू येवले, राजेंद्र बाबर, सूरज लोखंडे, नितीन रावलेकर, बाळासाहेब भांडे, मकरंद पेठकर, अविनाश सरोदे , रुपेश पवार, मुकुंद चव्हाण, उमेश वाघ ,  नितीन निगडे, बकुळ दाखवे, नागेश खडके ,  परेश खांडके, उत्तम भुजबळ,  दिलीप पोमण ,सागर माळकर , अरविंद दाभोलकर, मोहन पासलकर, अजय परदेशी, विजय नायर, राजेश मांढरे, परवेश राव  नितीन दलभंजन, ओंकार मारणे, शरद गुप्ते, हर्षद ठकार, प्रवीण डोंगरे, आशिष अढळ, सुरेश घाडगे , राहुल शेडगे, अजिंक्य पांगारे,  श्रीनिवास आखाडे, चंदन साळुंके, प्रसाद चावरे, बाळासाहेब मेमाने , बाळासाहेब बोऱ्हाडे, शैलेश जगताप, अनिकेत थोरात, धनंजय देशमुख, निखिल जाधव, संजय वाल्हेकर, नितीन थोपटे, सचिन घोलप महिला आघाडीच्या संगीता पवळे,  अमृता पठारे, संगीता भिलारे, अश्विनी मल्हारे, गौरी चव्हाण , दीपाली राऊत युवती सेनेच्या निकिता मराटकर, गायत्री गरुड, रोहिणी मडोळे अनेक शिवसैनिक आणि नागरिक यांनी सह्यांची मोहिमेत सहभाग नोंदवून सरकारचा निषेध केला . 


 

अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे

Post a Comment

Previous Post Next Post