रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली ; किसन जावळे यांची नियुक्ती



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचवेळी डॉ. म्हसे यांच्या जागी किसन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून डॉ. म्हसे यांची बदली केल्याचे सांगितले जाते.

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारकडून बदल्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर आहे.मर्जीतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करत असल्याचीही चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोकण आयुक्त कार्यालयात असणारे किसन जावळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. योगेश म्हसे यांच्या बदलीचे पत्र काढले आहे.

विशेष म्हणजे डॉ. योगे म्हसे यांनी गेल्या वर्षी 23 जानेवारी रोजी रायगडचा पदभार स्वीकारला होता. म्हणजे अवघ्या 13 महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आली आहे. एवढ्या अल्प काळात जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post