ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला पुणे विद्यापीठाचा युवा पुरस्कार जाहीर



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा युवा पुरस्कार बुद्धिबळ ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याला जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७५वा वर्धापनदिन शनिवारी (१० फेब्रुवारी) साजरा करत आहे. विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून यानिमित्त युवा गौरव पुरस्कार बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील बुद्धिबळ ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याला देण्यात येणार आहे.

अभिमन्यू पुराणिक याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हा बुद्धिबळ मधील प्रतिष्ठेचा किताब मिळवला होता.त्यानंतर अभिमन्यू पुराणिक याने २०१७ मध्ये बुद्धिबळातील ग्रँडमास्टर हा बहुमानाचा किताब मिळवला.शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्काराने अभिमन्यूचा महाराष्ट्र सरकारने गौरव केला आहे.  

आत्तापर्यंत अभिमन्यू पुराणिक हा ३५ देशांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा खेळला आहे.अनेक राज्य आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्याने घवघवीत यश संपादन केले आहे.सध्या त्याचे ELO rating २६४५ येवढे आहे.अभिमन्यूला प्रशिक्षक जयंत गोखले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शनिवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका भव्य कार्यक्रमात अभिमन्यूला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post