"राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) " येथे आंतरवासिता कार्यक्रम संपन्न झाला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे बी. एड्. प्रथम वर्षातील सेमीस्टर 2 मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक दोन "राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु.) " येथे  आंतरवासिता कार्यक्रम संपन्न झाला.

ही आंतरवासिता दिनांक 16/02/2024 पासून सुरू करण्यात आली होती. या आंतरवासितेदरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये निबंध स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर, वृक्षारोपण, पाढे पाठांतर, परिसर स्वच्छता, काव्यवाचन, शिवजयंती कार्यक्रम,क्रीडा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे उपक्रम राबविले होते.

 गुरूवार दिनांक 22/02/2024 रोजी आंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्र.प्राचार्या निर्मळे आर.एल. प्राचार्या कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगांव  तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे  मुख्याध्यापक  श्री.एस.एस.पाटील तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्री .एस.बी.चौगुले , व मार्गदर्शिका प्रा. शिरतोडे व्ही.एल. व प्रा.सौ.पवार.ए.आर.उपस्थित होते,व विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आंतरवासिता गटातील छात्राध्यापक,छात्राध्यापिका,  विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका शरयु चव्हाण यांनी केले.पाहुण्यांचा परिचय छात्राध्यापिका शर्वरी करपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका सुनंदा पवार यांनी केले. त्या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले व शाळेचे आभार मानले. 

छात्रध्यापिका वर्षा कोळी, दिपाली परीट, सुरेश चौगुले, वनिता कोंडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.एस.एस.पाटील सर व कुंभार मॅडम यांनी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये छात्राध्यापकांनी केलेल्या विविध आणि विशेष कार्यक्रमांची व कार्यवाहीची माहिती दिली व सर्व छात्राध्यापकांचे कौतुक केले.संस्थाचालक एस.बी.चौगुले सरांनीही आपल्या भाषणात छात्राध्यापकांना मार्गदर्शन व कौतुक केले.मार्गदर्शिका प्रा.शिरतोडे मॅडमनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना व छात्र अध्यापकांना मार्गदर्शन केले. छात्र अध्यापकांनी तेथील विद्यार्थ्यांना व सर्व स्टाफला अल्पोपहार दिला. स्पर्धेमध्ये गुणांकन प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले व शाळेसाठी ही उपयोगी भेट वस्तू दिली.छात्राध्यापिका श्रध्दा महाले यांनी आभार मानले. भेट दिलेल्या रोपांचे शाळेच्या परिसरातच रोपण करण्यात आले. अशाप्रकारे ही आंतरवासिता टप्पा क्र 1 अगदी व्यवस्थितरीत्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post