घरफाळा सवलत योजनेतून एका दिवसात 1 कोटी 25 लाख जमा

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले :

कोल्हापूर ता.13 : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस दंडव्याजामध्ये महापालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. 

या सवलत योजनेमधून आज एका दिवसात 604 मिळकत धारकांनी 1 कोटी 25 लाख रक्कम जमा केली आहे. महापालिकेच्यावतीने दि.24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 अखेर शहरवासायांनी या सवलत योजनेस प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या सवलत योजनेमध्ये शहरातील 5384 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून या कालावधीत थकीत 6 कोटी 68 लाख इतका घरफाळा वसूल झाला आहे. 

50 टक्के सवलत योजनेमधून नागरिकांना 1 कोटी 61 लाख 59 हजार 445 रूपयांची सवलत मिळाली आहे. या 50 टक्के सवलत योजनेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असून हि योजना दि.15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरु असणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post