योगा कार्यशाळा हे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहे



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड ) पेठ वडगाव या महाविद्यालयांमध्ये दिनांक 31 जानेवारी, 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत बी.एड द्वितीय वर्षातील सेमिस्टर चार मधील प्रात्यक्षिकांतर्गत समाजाभिमुख प्रकल्प या प्रात्यक्षिकातील सामूहिक उपक्रमातील योगा कार्यशाळा हे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहे . 

या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून योगा तज्ञ श्री अनिकेत केरबा कापडे यांनी योगासाठी मुलांना प्रशिक्षण दिले. या प्रात्यक्षिकाच्या कार्यवाहीसाठी प्रेरणास्थान प्राचार्या डॉ.निर्मळे आर.एल. मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रमुख सोरटे एस. के. व इतर प्राध्यापक शिरतोडे व्ही.एल. ,सावंत ए.पी. , डॉ.पवार ए.आर., ग्रंथपाल चौगुले एस एस व पाटील पी.व्ही.यांचे योग्य ते सहाय्य मिळाले. माजी विद्यार्थी अनिकेत कापडे यांनी द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना योगा विषयक योग्य ती माहिती व प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अशाप्रकारे 'योगा कार्यशाळा' पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post