छत्रपती व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट

 वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन


प्रेस मीडिया लाईव्ह ;

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे: संजय घोडावत समूहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात घोडावत विद्यापीठातील क्रीडांगणावर झाली. याचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश शेट्टी सांगली, अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार सांगली,अशोक शिंदे पुणे,शांताराम जाधव पुणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी शैक्षणिक संकुलनास सदिच्छा भेट देऊन येथील शैक्षणिक पायाभूत सुविधा,क्रीडांगण,संशोधन कार्य समजून घेतले.

          तसेच इथल्या सोयी सुविधांचे कौतुक केले. विद्यापीठाकडून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंची त्यांनी भेट घेतली. कबड्डी शरीरसौष्ठव,टेनिस,क्रिकेट मध्ये विद्यार्थी चमकदार कामगिरी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात येथील खेळाडूंना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

         यावेळी विश्वस्त विनायक भोसले,गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. बी.एम.हिर्डेकर,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे ,एसजीआय चे प्राचार्य डॉ.विराट गिरी,विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

  

Post a Comment

Previous Post Next Post