अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल (केंब्रीज) स्कूलला अवॉर्ड


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे - तालुका हातकणंगले येथे दि 15 फेब्रुवारी रोजी गोवा या ठिकाणी झालेल्या 'केंब्रिज स्कूल्स कॉन्क्लेव्ह, दक्षिण आशिया' या कार्यक्रमात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला (केम्ब्रिज विभाग) यांना शैक्षणिक उत्कृष्टता श्रेणीतील प्रतिष्ठित मानला जाणारा 'केंब्रिज स्कूल रेकग्निशन अवॉर्डने' सन्मानित करण्यात आले.


दक्षिणपूर्व आशिया विभागातील प्रथम 5 शाळांमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल केम्ब्रिज विभागाने स्थान पटकावले . श्री महेश श्रीवास्तव, प्रादेशिक संचालक, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, श्री ज्युलिएट विल्सन, संचालक मूल्यांकन, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी यांच्या उपस्थितीत श्रीमती सस्मिता मोहंती, संचालिका प्राचार्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत श्री सॅमसन गोन्साल्विस, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेलागावीचे प्राचार्य यांनीही हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना दिले जात असणारे दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक सुविधा, शैक्षणिक क्षेत्रातील नवोपक्रम, जागतिक दर्जाचे शिक्षण, उत्कृष्ट निकाल, उच्चशिक्षित शिक्षक, प्रायोगिक शिक्षण पद्धती यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

मुळशी पुणे येथे या शैक्षणिक वर्षापासून निवासी केंब्रिज स्कूल मॅनेजमेंट सुरू करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तिथेही उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जाणार यात शंका नाही असे त्यांनी मत व्यक्त केले. " चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी एस जी आय टीमचे, व सस्मिता मोहंती मॅडम यांचे अतूट समर्पण आणि शिक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.


Post a Comment

Previous Post Next Post