लोकशाही न्यूज चैनल ला घातलेल्या बंदी विरोधात आप चे आंदोलन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : भारतीय लोकशाही चा चौथा खांब असलेल्या वृत्तपत्र तसेच न्यूज चैनल यांच्यावर अलीकडच्या काळात वारंवार बंधने लादली जात असल्याचे दिसून येत आहे. याचंच एक ताजे उदाहरण म्हणजे मराठी न्यूज चॅनेल लोकशाही यावर पुढील 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 

अशाप्रकारे बंदी घालणे म्हणजे लोकशाहीचा एक प्रकारे आवाज दाबण्याचा प्रकार असून अशा प्रकारामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 चे उल्लंघन होत आहे असा आरोप करत आज आम आदमी पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांत कांबळे (शहराध्यक्ष अनुसूचित जाती आघाडी) यांच्या नेतृत्वात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

 यावेळी प्रशांत कांबळे म्हणाले, लोकशाही मराठी हा न्यूज चैनल महाराष्ट्रातील घडामोडी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो. परंतु त्याच्यावर बंदी घालून भाजपा सरकारने वृत्त संस्थांची दडपशाही सुरू केली आहे. अशाप्रकारे वृत्तसंस्थांची दडपशाही करणे हे भारतीय लोकशाहीला घातक असून त्याचे दुर्गामी परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागतील. अशाप्रकारे जर वृत्तवाहिन्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि त्यांच्यावर बंदी आणली तर सर्वसामान्य जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवणार कोण? पत्रकारितेला आपण भारतीय लोकशाहीचा चौथा खांब समजतो परंतु राज्य आणि केंद्र सरकार हा चौथा खांबच तोडायला सरसावले आहे त्यामुळे या देशात येणाऱ्या काळात खरंच लोकशाही राहील का? हा यक्ष प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

आपला देश 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला खरा पण अशाप्रकारे दडपशाही करुन राजकीय नेत्यांनी आपल्याला पुन्हा एकदा पारतंत्र्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकशाही न्यूज चैनल वर घातलेल्या बंदीला आम आदमी पक्षातर्फे आम्ही विरोध करत आहोत. ही घटने विरोधातील कारवाई महाराष्ट्र सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांनी त्वरित मागे घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.

आम आदमी पक्षातर्फे या आंदोलनाला प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, विवेक तुपे, अमित म्हस्के, अभिजीत गायकवाड, डॉ.किशोर शहाणे, शितल कांडेलकर, विजय लोखंडे, मयूर कांबळे, ॲड.अभिजीत खंडागळे, मिलिंद सरोदे, कुमार धोंगडे, किरण कांबळे, ॲड.गणेश थरकुडे, ॲड. सागर बारगीर व उमेश बागडे हे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post