विशेष वृत्त : इमारत व इतर बांधकाम कामगार प्रमाणे, पत्रकार व फोटोग्राफर यांना लाभ मिळवण्यासाठी लढा उभारणार.------ राज्य प्रवक्ते संतोष पाटील.



प्रेस मीडिया लाईव्ह :

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना संबोधले जाते ते सर्व दैनिकाचे,मासिकाचे, साप्ताहिकाचे,पोर्टल, यूट्यूब चैनल चे सर्व पत्रकार, छायाचित्रकार, फोटोग्राफर, प्रतिनिधी यांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयमध्ये अधिकृत नोंदणी करण्यासाठी, इमारत व इतर बांधकाम कामगारा प्रमाणे नोंदणी करून त्यांना त्यांच्या मुलांना व संपूर्ण कुटुंबांना सरकारकडून जे लाभ मिळतात त्याच पद्धतीचे सर्व लाभ पत्रकार,फोटोग्राफर यांना मिळण्यासाठी यांची सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी करून त्यांना लाभ मिळावेत.

कारण पत्रकार व फोटोग्राफर हे असंघटित कामगार मध्ये मोडतात त्यांना कामावर आले तरच पगार मिळतो, काही जणांना  मानधन भेटते तेही तुटपुंजे त्यातच मोबाईल आणि सोशल मीडियामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उपासमार होत आहे. एखाद्या फोटोग्राफरने फोटो काढले तर त्यांना संपादका शिवाय कोणीही पैसे देत नाही कारण एखाद्या कार्यक्रमात फोटोग्राफरने फोटो काढले तर सगळेजण आम्हाला फोटो पाठवा असे म्हणतात पण त्यांना कुठलाही चार्ज देत नाहीत त्यामुळे त्यांना फुकटच सेवा करावी लागते त्यात त्यांचे पेट्रोल,मोबाईलचा डाटा व नेट, नाश्ता जेवण यासाठी हे ते घरातूनच पैसे घ्यावे लागतात, घरातील तर किती दिवस यांना पैसे पुरवणार. 

पत्रकार, फोटोग्राफर यांचं भविष्य अंधारमय आहे. त्यांना कुठलीही पेन्शन,ग्रॅज्युटी, फंड व इतर कुठलेही लाभ नसतो त्यामुळे त्यांच्या उतारावयात त्यांच्याकडे हॉस्पिटल व औषधालाही पैसे उरत नाहीत इतरांवर अवलंबून राहावे लागतं त्यातच तुटपुंज्या मानधनावर कुटुंब व स्वतःचा खर्च सांभाळावा लागतो. त्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही व कुठलेही लाभ मिळत नाहीत म्हणून सर्व पत्रकार व त्यांचे फोटोग्राफर यांची सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त  कार्यालय मध्ये नोंदणी करून त्यांना ज्याप्रमाणे इमारत व इतर बांधकाम कामगारांना जे लाभ मिळतात ते सर्व लाभ पत्रकारां व फोटोग्राफर यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी लढा उभा उभारणार.

नोंदणीकृत कामगारांना  स्वतःला, मुलांच्या,मुलीच्या लग्नासाठी ,शिक्षणासाठी, व हॉस्पिटल साठी तसेच कामगाराच्या मृत्यूनंतरही कुटुंबासाठी लाभ मिळत असतो त्याच पद्धतीने पत्रकार व फोटोग्राफर यांना लाभ मिळवण्यासाठी त्यांची सहाय्यक आयुक्त कामगार नोंदणी कार्यालयांमध्ये नोंदणी होण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात तीव्र लढा उभारणार अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार दिना दिवशी सर्व पत्रकार व फोटोग्राफर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्याचे बांधकाम कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री यांना लवकरच भेटून निवेदन देणार आहे अशी माहिती पत्रकार दिना दिवशी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post