विशेष वृत्त :एसटीचा फुकटचा प्रवास करण्यासाठी बनावट आधार कार्डाचा वापर

पुरुषासह महिलाही आघाडीवर.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर- शासनाने एसटीचा प्रवास जेष्ठ नागरिकांसाठी (75 वर्षे.पूर्ण) मोफ़त प्रवासांची सवलत दिली.तसेच महिलांच्यासाठी निम्म्या दरात प्रवासाची सोय केल्यामुळे महिलांची गर्दी लक्षणीय दिसून येत आहे.

काही शासनाने एवढ़या सवलती देऊन सुध्दा ज्याचं वय बसत नसताना फुकटचा एसटी प्रवास करण्यासाठी काही महिला आणि पुरुष आधार कार्डावर जन्म तारीख वाढ़वून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यांच्यावर आणि बनावट आधार कार्ड तयार करून देणारयावर कारवाई होणे गरजेचे आहे.काही वाहक फक्त आधार कार्ड पाहुन तिकीट देतात तर काही वाहक चाणाक्ष नजरेने आधार कार्ड पाहून संबंधित प्रवाशाला एक तर फुल तिकीट घ्यायला भाग पाडते किंवा त्याचे आधार कार्ड जप्त केले जाते.

असाच प्रकार तासगांव डेपोच्या वाहकाने उघडकीस आणून एकाचे आधारकार्ड जप्त करून फुल तिकीट घ्यायला भाग पाडले.बीडहून कोल्हापुरात आलेल्या अंदाजे 10 ते 15 महिला आणि पुरुष तासगांव डेपोच्या एसटीतुन प्रवास करीत होते.वाहकाने त्यांना तिकीट देत असताना आम्ही जेष्ठ नागरिक असल्याचे सांगुन आधार कार्ड दाखविले असता त्या प्रत्येकाच्या आधार कार्डावर 1948 च्या सालातील जन्म तारखेचा उल्लेख होता.त्या चाणाक्ष असलेल्या वाहकांच्या नजरेने ते आधार कार्ड बनावट असल्याचं ओळखलं कारण त्या प्रवाशाचं वय दिसत होतं 50 ते 60 .आणि त्यांच्या आधारकार्डावर वय दाखवत होते 89 ते 90. त्यामुळे वाहकाने त्या प्रवाशांना तिकीट घेण्यास सांगितले पण त्यातील काही प्रवाशांनी वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरवात केली त्यातील काही प्रवाशानी आम्ही बीडहुन हेच कार्ड दाखवून प्रवास केला आहे.त्या वाहकाने आम्हाला काही बोलले नाही.तुम्ही का अडवण लावताय एसटी शासनाची असून आम्हाला शासनाने फुकट प्रवासाची सोय केली आहे असे त्यातील काही जण म्हणत होते.

पण हा वाहक त्यांना दाद न देता त्या प्रवाशाचे कार्ड SCAN करून पाहिले असता ते बनावट असल्याचे आढ़ळल्यामुळे त्या  प्रवाशाचे आधार कार्ड जप्त करून बाकीच्या प्रवाशांना तिकीट घ्यायला भाग पाडले.ह्या साइटचे लोक बनावट आधार कार्ड काढ़ून  महाराष्ट्रात एसटीने फुकटात प्रवास करीत असल्याचे आढ़ळले आहे.याचा शासनाने विचार करून अशा पध्दतीने प्रवास करणारयांवर कारवाई करून बनावट आधार कार्ड तयार करून देणारयावरही कारवाई केली तरच अशा प्रकाराला आळा बसेल.

Post a Comment

Previous Post Next Post