लहान मुलाच्या हक्कासाठी आईचा संघर्ष,करणाऱ्या ७५ वर्षीय आईचे उपोषण मागे.



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 कर्जत तालुकयातील जमिनींना सध्या सोन्याचा भाव आहे. मागील काळात येथील जमिनीच्या खरेदीविक्रीत देखील मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अनेकदा जमिनीवरून वाद समोर आले आहेत. तर याच जमिनीवरून कुटुंबात देखील कलह होण्याचे प्रकार अधिक आहेत. अशात जमिनीवरून दोन भावात वाद निर्माण झाल्यावरून चक्क लहानमुलाच्या हक्कासाठी थेट आईने संघर्ष सुरु करत  मोठ्या मुलाने जमीन देण्यास नकार दिल्याने मोठ्या मुलाच्या विरोधात ७५ वर्षीय वृद्ध आई दि. ४ जानेवारी पासुन  उपोषणाला बसल्या होत्या. मात्र नायब तहसिलदार व ग्रामस्थ यांच्या विनंतीला मान देत ७५ वर्षीय वृद्ध आई आपले उपोषण हे मागे घेतले  आहे. 

कशेळे येथील जुना सर्वे नं. ८२/१३ नविन सर्वे नं. ३६/ १३ मधील १७ गुंठे क्षेत्र ही जमीन कशेळे येथील लक्ष्मीचंद दामोदर गोर यांचेसह दत्तात्रेय पिंपरकर, अशोक शिंदे, संभाजी कोकणे आणि रघुनाथ कडलक यानी सामायिकरित्या खरेदी केली होती. त्यापैकी ९ गुंठे जमिनीचे पैसे लक्ष्मीचंद दामोदर गोर आणि उर्वरीत ८ गुंठे जमिनीचे पैसे दत्तात्रेय पिंपरकर, अशोक शिंदे, संभाजी कोकणे आणि रघुनाथ कडलक यांनी दिले होते. 

या १७ गुंठे जमिनीपैकी गोर यांचा वाटा मोठा असल्याने गोर कुटुंबाने मोठा मुलगा विरेंद्र गोर याचे नावे सदर जमीन  खरेदी केली. गोर याना  विरेंद्र व ललित असे दोन मुले आहेत. गोर यांनी उर्वरित चौघांना त्यांच्या हिस्याची ८ गुंठे जमीन ताब्यात दिली तर हिस्स्याच्या ९ गुंठे जमीनीपैकी दोघा मुलांना समान ४.५ गुठे देण्याचे गोर पती पत्नीचे ठरले होते. विरेंद्र यांने ललीत यास ४.५ गुंठे जमीन देण्याचे अनेक वेळा मान्य केले. परंतू आता त्याची पत्नी वैशाली विरेंद्र गोर ही दिराला जमीन देण्यास विरोध करीत आहे. त्यामुळे मुलांची आई चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर यांनी मुलगा विरेंद्र यास याबाबत अनेकवेळा सांगूनही पत्नीच्या विरोधामुळे ललीत यास विरेंद्र यांनी जमीनीचा हिस्सा दिलेला नाही अशी माहिती चंद्रकांता गोर यांनी दिली आहे.  लक्ष्मीचंद गोर यांचे २००६ साली निधन झाले. त्यानंतर दोन्ही मुले २०११ साली विभक्त झाली असून तेव्हापासून ललीत हाच आईचा माझा सांभाळ करीत आहे. गेल्या १२-१३ वर्षात माझ्या मोठ्या मुलाने माझी कधीही काळजी घेतली नाही. ललील यास त्यास वाटयाचा हिस्सा दयावा म्हणून ग्रामस्थांनाही विरेंद्र यास विनंती केली. परंतू पत्नीच्या विरोध व दबावामुळे विरेंद्र जमीन देण्यास टाळाटाळ करत आहे. तेव्हा त्या न्याय हक्कासाठी द्दिनांक ४ जानेवारी पासून कशेळे पोलीस दूरक्षेत्र येथे आमरण पोषणाला बसल्या होत्या. परंतू कशेळे गावातील चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर या गुरुवार दिनांक ४ जानेवारी पासून उपोषणास बसल्या होत्या.त्यांचे उपोषण सुटावे या करिता कशेळे ग्रामस्थ यांनी मुलगा वीरेंद्र यास उपोषण स्थळी बोलावून घेतले. 

आईला या वयात उपोषण करायला लावू नकोस, यात कदाचित तिचा जीव जाऊ शकतो असे समजावले. परंतु मुलगा वीरेंद्र आणि त्याची पत्नी यांनी ग्रामस्थाना यामध्ये पडू नका. आई मेली तरी चालेल, जमीन तर नाहीच पण डोक्याला टिळा लावण्यासाठी चिमुटभर माती पण देणार नाही असे सांगितले.आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत  यांनी उपोशण स्थळी भेट दिली. आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करा त्या नुसार जे होण्या सारखे असेल ते करण्यास मी नक्की मदत करील असे आश्वासन दिले.

 ग्रामस्थ उदय पाटील यांनी देखील चंद्रकांता गोर यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.या प्रसंगी कशेळे पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल लालासाहेब तोरवे माजी सरपंच जयराम हारपुडे, कशेळे मंडल अधिकारी बाबासो शेट्टे, तलाठी प्रशांत ढाकणे, वारे तलाठी विलास मिरगणे, पूनमभाई पटेल, पांडुरंग भोईर, स्वप्नील हगवणे,सदानंद मते हे सर्व ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी या सर्वांनी चंद्रकांता यांना उपोषण मागे घेण्या बाबत आग्रह केला.सर्वांच्या आग्रहाचं मान ठेऊन चंद्रकांता गोर यांनी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post