श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी भारतीय जनता पार्टी वतीने मंदीर स्वच्छ अभियान;


प्रेस मीडिया लाईव्ह :

पंतप्रधान नरेंद्र मोदी

इचलकरंजी ता १६  : श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान राबविण्यात आवाहनाला प्रतिसाद देत  स्वत: सहभागी होत प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार सुरेशराव हाळवणकर येथील प्राचीन विठ्ठल मंदिर मंदीराची स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली.

अयोध्येतील राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थ क्षेेत्रे, मंदीरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार इचलकरंजीसह   ग्रामीण परिसरातील मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान भाजपा वतीने राबविण्यात येणार आहे,यावेळी बोलताना  हाळवणकर यांनी म्हटलं की, मला असं वाटतं मोदीजींनी सर्वांनाच आवाहन केलंय आपली श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवावीत, अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय त्यावळे मंदिरं स्वच्छ असावीत.

आज आम्ही सर्व स्वच्छता मोहिमेत सहभागी झालो. आम्ही प्रतिकात्मक स्वच्छता केलेली आहे, यामुळे एक नवी अनुभूती देखील मिळाली देशात व राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता सुरू आहे. सर्वत्र उत्साह दिसत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुरेश हाळवणकर यांनी दिली 

आहे मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत आज इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्राचीन विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, मखतुम दर्गा परिसर ,मारुती मंदिर गुजरी पेठ संत रोहिदास समाज मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले . 

यावेळी शहराध्यक्ष पै अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ रमाताई फाटक, सौ अश्विनी कुबडगे, सौ पुनम जाधव, पांडुरंग म्हातुंगडे, राजेश रजपुते,रिषभ जैन प्रशांत शालगर,अरुण कुंभार,अमर कांबळे आण्णा आवळे , उमाकांत दाभोळे,रणजित अनुसे ,मारुती पाथरवट ,राजू पुजारी ,नितीन पडियार ,नामदेव सातपुते , सचिन माळी, राजेंद्र पाटील, राहुल जानवेकर,नागेश पाटील , म्हाळसाकांत कवडे, अली खान,अनिस महालदार, श्रेयस गट्टानी ,राजू भाकरे, प्रदीप मळगे ,महेश पाटील, बाळकृष्ण तोतला,अवधुत पाटील,,प्रमोद बचाटे, सचिन परीट, दिलीप रेपे, महेश लोहार, सचिन कोरे ,विपुल खोत, उत्तम चव्हण अशोक पुरोहित , प्रमोद पाटील रावसाहेब कदम, राहुल पवार, जहांगीर पट्टेकरी, विजय हरुलमठ ,प्रमोद कोपते ,सौ सरला घोरपडे ,शबाना शहा,राजेश पवार, बुथ प्रमुख भाजपा, युवा मोर्चा सह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Post a Comment

Previous Post Next Post