आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवत ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे : प.पू.श्री जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी, ता.६ : महायज्ञ हा केवळ भक्तीचा मार्ग नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ प्राप्त करण्याचा मार्ग आहे.भक्तीमुळे मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरीत्या आत्मसात करता येते.यातून परमात्म्याचे ज्ञान झाले की मोक्षाचा मार्गदेखील गवसतो. आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवत ग्रंथाचा  सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे.तरच ग्रंथाचा खरा अर्थ समजेल,असे आशीर्वचन करवीर पीठाचे प.पू.श्री जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.



जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी यांनी आज १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला भेट दिली. राजस्थानचे परपुज्य संत श्री श्री १०८ सितारामदासही यांच्यासह साधु संत महंतांसह  जगदगुरु शंकराचार्य यांच्या भेटीने आज  दुग्ध शर्करा योग पाहायला मिळाला. सकाळी श्री वरदविनायकाच्या साक्षीने प.पू.श्री जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या पद्मचरण पाद्य पुजन श्री.व सौ बाळासाहेब ओझा या दांपत्याचे हस्ते झाले. उपस्थित भक्तांनी त्यांचे दर्शन  घेतले.सकाळच्या सत्रात श्री श्री १०८सितारामदास महाराज च्या मार्गदर्शनाखाली 

१०८ कुंडीय गणपती महायज्ञ,  योगा व ध्यान शिबिर,अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आज पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती महापुराण कथा व नानीबाई का मायरा या संगीतमय कार्यक्रमाचा समारोप झाला.

अखेरच्या दिवशी संगीत कैलास चंद्रजी जोशी महाराज व पंडित अक्षयजी गौड यांनी कथा आणि संगीतातून उपस्थित भक्तांना भक्तीमार्गावर चालण्याचा मूलमंत्र दिला.

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच श्री गणपती महायज्ञ होत असल्याने परजिल्हासह विविध भागाभागातून पंचगंगा काठावर भक्तांचा मेळाच भरला आहे.

उद्या सोहळ्यातील पहिला रविवार असल्याने भक्तांचे मोठी गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने संयोजन समितीने तयारी केली आहे. रविवारपासून श्रीमद भगवदगीता अठरा अध्याय, ज्ञानचर्चा आणि सनातन संस्थेच्यावतीने विशेष प्रवचन या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.तसेच सायंकाळी पंचगंगेच्या भव्य पंचगंगा दीपमहोत्सव कार्यक्रम होणार आहे.असे भरगच्च कार्यक्रम आणि भक्तांची होणारी गर्दी यामुळे रविवारच्या दिवसाला विशेष महत्त्व येणार आहे. 

सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, पंचगंगा वरदविनायक मंदिर भक्त मंडळ गायत्री सेवा, जय जगदंबा सत्संग माय फाउंडेशन करंट मारुती सत्संग केशर आणि समाज ग्रुप अदि मंडळ संसद पदाधिकारी सर्व कार्यक्रमाचे आयोजन करत आहे

Post a Comment

Previous Post Next Post