हज हाऊस सुरु करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रा.काँ. अल्पसंख्यांक विभागाचे शहर कार्याध्यक्ष गौस पठाण यांनी केली मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (प्रतिनिधी):- 

येत्या रमजान महिन्यानंतर हजला जाण्यासाठी भाविकांची थांबण्याची व्यवस्था तसेच प्रशिक्षणासाठी येथील हज हाऊस तत्काळ सुरू करावे अशी मागणी केली आहे. औरंगाबाद शहरा मध्ये हज हाऊस तयार होऊन आज सुमारे ३ वर्ष झाले असून आता पर्यंत त्याची उघडण्याची क्रिया झाली नाही करीता आपण याच्यात लक्ष घालुन २०२४ चे हजला जाणारे श्रध्दालूंना सहकार्य करावे अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे आ. सतीश चव्हाण व अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेख रफीक भाईजी,रा.काँ. अल्पसंख्यांक विभागाचे शहर कार्याध्यक्ष गौस अहेमदोद्दीन पठाण यांनी मागणी केली आहे. 

औरंगाबाद शहरामध्ये मध्य विभागात हज हाऊस करीता मोठी इमारत बांधण्यात आली असून ती तयार होऊन ३ वर्ष झाले असून आता पर्यंत त्याची उघडण्याची क्रिया झाली नाही व त्याच बाजूला वंदे मातरम हॉल व्यवस्थीत रितीने चालु झाले आहे.

 आज पर्यंत हजसाठी जाणारे श्रध्दालूंना प्रशिक्षणासाठी संपुर्ण मराठवाडातून येऊन खाजगी ट्राव्हल्स एजन्सीवाले खाजगी हॉल घेऊन प्रशिक्षण देतात व त्यांना स्वतःचे खर्चाने हॉटेलस मध्ये किंवा नातेवाईकाकडे थांबावे लागतात. हयामुळे हजला जाणार्‍या मराठवाडयातील नागरीकांना खुप त्रास सहन करावे लागत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: या मागणीकडे लक्ष देवून तात्काळ हज सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी गौस अहेमदोद्दीन पठाण यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post