कोल्हापूर येथे झालेल्या दोन ठिकाणी घरफोडीत 40 हजारांची रोकड लंपास .


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे:

कोल्हापुर-शहरातील कणेरकरनगरातील दोन बंद घरांची कुलपे तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश करून 40 हजारांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी  म्हामुलकर आणि हिरेमठ यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक माहिती अशी की,कृष्णात आनंदा म्हामुलकर (वय 34)आणि राचय्या हिरेमठ हे  कणेरनगर येथे रहात असून म्हामुलकर हे 14 जानेवारी रोजी कुंटुबिया समवेत बाहेर गावी गेले होते.या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटे उचकटून त्यातील 24 हजार रोख रक्कम लांबवली आहे.त्यानंतर चोरट्यांनी राचय्या हिरेमठ यांच्या घरात कुलूप तोडुन घरात प्रवेश करून कपाटातील 15 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली आहे.सोमवारी संध्याकाळी म्हामुलकर घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले अ सता त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना फोन करून माहिती दिली अ सता पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून चोरट्यांचा माग काढ़ण्यासाठी श्वानास पाचारण केले.या ठिकाणी झालेल्या घरफोडीने नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस पुढ़ील तपास करीत आहेत.

-------------

रस्ता क्रॉस करताना झालेल्या अपघातात आजी व नात जखमी.

कोल्हापुर- करवीर तालुक्यातील केर्ली ते जोतिबाला जाणारयां मार्गावर एका दुकानासमोर रस्ता क्रॉस करत असताना एका दुचाकी स्वाराने आजी आणि नातीला जोरात धडक दिल्याने त्यात जखमी झाल्या आहेत.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून दुचाकी चालविणारयां तरुणावर भरधाव वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात बाळाबाई पंडीत कदम (60)आणि आर्वी संदिप कदम (वय 7.रा.केर्ली).अशी अपघातात जखमीची नावे आहेत.

----------- --

टाकाळा येथे  10 कोंबड्या आणि  3कोंबडे चोरट्यांनी लांबविल्या.

कोल्हापुर-शहरातील टाकाळा परिसरात असलेल्या हिंदकन्या छात्रालयाच्या पाठिमागे रहात असलेले शहनाज कैयुम सय्यद (51) यांच्या दारातील 10 खडकी कोंबड्या आणि 3 कोंबडे असा 8  हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार 13 जानेवारी रोजी घडला असून शहनाज कैयुम सय्यद यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात राजू कसबेकर (रेल्वे फाटक ) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.आम्ही पाळलेल्या कोंबड्या त्यानेच चोरलयाचे तक्रारीत म्हटले आहे.पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मेश्राम अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post