कोल्हापूर खासदार चषक स्पर्धेत वेदांत गावडे, श्वेताली टाकळे व अंजली टाकळेला सुवर्ण



प्रेस मीडिया लाईव्ह ;

शिरोळ/ प्रतिनिधी :

    शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या खासदार चषक मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेमध्ये शिरोळ तालुक्यातील पाच खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. वेदांत गावडे, श्वेताली टाकळे व अंजली टाकळे या दोघांना सुवर्ण पदक मिळाले.

   मुलींच्या बारा वर्षाखालील गटामध्ये श्वेताली टाकळे हिने सुवर्णपदक तर पूर्वा कांबळे हिने रौप्यपदक मिळवले. तसेच मुलींच्या 14 वर्षे खालील गटात अंजली टाकळे हिने सुवर्णपदक मिळवले.मुलांच्या 14 वर्षाखालील गटात वेदांत उर्फ मयूर गावडे यांने सुवर्ण तर श्रेयश देबाजे याने  कास्यपदक जिंकले.  वरील सर्व खेळाडू हे श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याच्या कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब व कुस्ती केंद्राचे खेळाडू आहेत.

  या विद्यार्थ्यांच्या यशामुळे कै. दत्ताजीराव कदम केंद्राचा नावलौकिक वाढला आहे. वरील सर्व खेळाडूंचा सत्कार श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखाना संचालक दरगू गावडे, शेखर पाटील, प्रमोद पाटील, अशोकराव कोळेकर, दिलीप पाटील कोथळीकर, सातगोंडा गौराजे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, शाळेचे मुख्याध्यापक रवीकुमार पाटील, श्रीमती माणिक नागावे, अरुण पाटील तसेच प्रशिक्षक संजय देबाजे व अश्विनी देबाजे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post