बी.एड्.प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साधन निर्मिती व वापर या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या डॉ .सौ. निर्मळे आर. एल. होत्या.



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन "(बी.एड्.)पेठ वडगाव येथे शनिवार, दिनांक 09 डिसेंबर 2023  रोजी  " शैक्षणिक साधन निर्मिती व वापर कार्यशाळा" ही बी.एड्.प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. द्वारकानाथ विठ्ठल भोसले ,सहाय्यक शिक्षक कन्या विद्यामंदिर,हुपरी नं.१  उपस्थित होते.



कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्या डॉ .सौ. निर्मळे आर. एल. होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शकांचा परिचय प्रा.सावंत ए.पी. यांनी केले.  प्राचार्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शक भोसले सरांनी विविध विषयानुसार शैक्षणिक साधन निर्मिती कशी करावी व त्या साधनाचा त्या घटकांमध्ये कशाप्रकारे वापर करावा याचे सविस्तर कृतीयुक्त मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याकडून शैक्षणिक साधन तयार करून घेतले व तयार केलेल्या साधनांचे ज्ञानरचनावादानुसार नमुना पाठाचे विद्यार्थ्यांकडून प्रेझेंटेशन करून घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.निर्मळे आर.एल. मॅडम यांनी अध्यापन करताना शैक्षणिक साधन किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितले.त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रथम वर्षाची छात्राध्यापिका निवेदिता पाटील यांनी मानले व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका शर्वरी करपे यांनी केले.

 अशाप्रकारे ही एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्रा.शिरतोडे व्ही. एल., प्रा. पवार ए.आर.,प्रा. सोरटे एस. के.,प्रा.सावंत ए. पी., ग्रंथपाल सहाय्यक पाटील पी.व्ही.तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड्.प्रथम वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post