बी.एड्. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित,," कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.)पेठ वडगाव" येथे प्रथम वर्ष "शैक्षणिक साधन निर्मिती व वापर" या प्रात्यक्षिक अंतर्गत शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी महाविद्यालयामध्ये बी.एड्. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन भरविण्यात आले. 


या कार्यक्रमाचे उद्घाटन  कै .सौ मालतीदेवी वसंतराव पाटील महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय मिरज येथील प्राचार्या डॉ. सौ.खामकर एस. बी.यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर. एल.होत्या. प्राचार्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्या खामकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण साधनांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांनीही आपण तयार केलेल्या शैक्षणिक साधनांचे प्रेझेंटेशन अगदी उत्तमरीत्या केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनीही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. अध्ययनअनुकूल ,अध्ययन सुलभ,अवधान केंद्री,आशय समृद्ध,व्यावहारिक,

उद्दिष्टाधिष्ठित,ज्ञानसंपृक्त,

माहितीपूर्ण,मनोरंजक,

अल्पमोली-बहुगुणी

विद्यार्थी स्नेही असे शैक्षणिक  साधनांचे विविधांगी महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची छात्राध्यापिका शर्वरी करपे यांनी केले. अशाप्रकारे हे शैक्षणिक साधन प्रदर्शन अगदी उत्तम रित्या पार पडले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक शिरतोडे व्ही.एल.,प्रा.पवार ए.आर.,प्रा.सोरटे एस. के., प्रा. सावंत ए.पी., ग्रंथपाल चौगुले एस. एस., ग्रंथपाल सहाय्यक पाटील पी. व्ही.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड्. प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक, छात्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post