पनवेल महानगरपालिकेची कोल्हापूर केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडली

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "अ" ते गट "ड" मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर एकूण ५५ हजार २१४ एवढे उमेदवार परीक्षा देत आहेत. ही परीक्षा टि.सी.एस. कंपनी मार्फत घेण्यात येत आहे. दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रिसर्च कोल्हापूर व आयऑन डिजिटल झोन आयडीझेड शिये या दोन केंद्रावर एकुण अनुक्रमे २ व ३ सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिले सत्र स.९ ते ११ व दुसरे सत्र दु. १ ते ३ व तिसरे सत्र सायंकाळी ५ ते ७ अशा स्वरुपात परीक्षा पार पडली. परीक्षेमध्ये एकूण ११५४ एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता.


परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपीक व एक शिपाई नियुक्त करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता या केंद्रांवर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये याबाबत योग्य ती दक्षता घेणेकरीता, शासनमान्यता प्राप्त मे. ई.सी.आय.एल (ECIL) या कंपनीची प्रत्येक परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आलेल होते.


 परीक्षेकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचार्‍यांनी अपार मेहनत घेतली असून त्यास पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले.  त्यामुळेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही व परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली आहे,  अशी माहिती नागेंद्र मुतकेकर, जिल्हा समन्वयक कोल्हापूर जिल्हा, पनवेल महानगरपालिका यांनी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post