हेरले येथे जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये दुर्गंधी धुराचे लोट हेरले ग्रामपंचायतचे दुर्लक्ष



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी  / संदीप कोले 

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील माळभाग परिसरामध्ये हेरले हायस्कूल हेरले  जिल्हा परिषद शाळे जवळ  पडीक   खण आहे या खणीमध्ये पाणी नसलेले ती कोरडी आहे ती मुजवण्यासाठी ग्रामपंचायत ने गावातील घाण टाकण्यास सुरुवात केली असून त्या खणीमध्ये  विविध प्रकारचे प्लास्टिक पिशव्या मेडिकल वेस्ट कचरा आठवडी बाजारात पडणारा सर्व कचरा  व इतर घनकचरा  टाकला जातो. आणि तो पेटवला जातो.  त्यामुळे या परिसरामध्ये प्रदूषण व दुर्गंधी पसरली आहे.

 त्या दुर्गंधी धुरामुळे शरीरास तसेच श्वासनास नागरिकांना त्रास होत आहे. गेले चार-पाच दिवसापासून असाच सातत्याने धुराचे लोट पसरत असल्यामुळे आसपास नागरिकांना व दोन्ही शाळेतील लहान मुलांना त्रास सहन  करावा लागत आहे  तरी ग्रामपंचायतने या नागरिकांचा व शाळेतील मुलांचा विचार करून लवकरात लवकर याबाबतीत विचार करावा अन्यथा काही दुर्घटना घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार असे मत नागरिकांच्यातून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post