जे एम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातुन ग्रेडर मशीन मोफत देण्यात आली

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

  आम्हा युवकांचे आधारस्तंभ प्रितमदादा जे.म्हात्रे यांचे उसराई क्रिकेट टीम, युवक विकास मंडळ, ग्रामपंचायत कमिटी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच देवळोली ग्रामस्थांच्या वतीने मनापासुन धन्यवाद.


शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.देवेंद्र अनंत पाटील उर्फ देवाभाई हे पहिल्यांदाच देवळोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणुन ज्या तरुणांचे प्रतिनिधी म्हणुन निवडणुकीला सामोरे गेले व विजयी झाले. त्यानंतर त्यांनी देवळोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गावातील तरुणांसाठी व क्रिकेट टीमसाठी पुढाकार घेऊन रसायनी पंचक्रोशीतील उत्तम प्रकारे सपाट ग्राऊंड बनवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार, पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.प्रितमदादा जनार्दन म्हात्रे यांच्या सोबत पाठपुरावा करुन जे एम एम कंपनीचे

 प्रतिनिधी युवा नेते मंगेशदादा अपराज यांच्या संपर्कात राहुन आज दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी उसराई क्रिकेट टीमचे मैदान तयार करुन घेण्यासाठी जे एम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातुन ग्रेडर मशीन मोफत देण्यात आली आहे त्याबद्दल आम्हा युवकांचे आधारस्तंभ प्रितमदादा जे.म्हात्रे यांचे उसराई क्रिकेट टीम, युवक विकास मंडळ, ग्रामपंचायत कमिटी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच देवळोली ग्रामस्थांच्या वतीने मनापासुन धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post