पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला

  संस्थेमधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी जमा न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवर अली  शेख  : 

पुणे पोलिसांनी पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर  फसवणुकी सह पीएफ मध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संस्थेमधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी जमा न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 74 लाख रुपये फसवणुकीचा हा प्रकार आहे. यामुळे सर्वत्र  जोरदार  खळबळ उडाली आहे . 

मारुती नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील भविष्य निर्वाह निधीतील हा प्रकार आहे. या शाळेतील दीडशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ कपात झाली. सुमारे 74 लाख रुपये कपात करण्यात आली होती. परंतु ही रक्कम पीएफ खात्यांमध्ये भरली गेली नाही. मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली. कर्मचाऱ्यांचे तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी पगारातून कपात केल्यानंतर भरले नाही. कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्याचे साठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मारुती नवले यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएफची रक्कम न भरणाऱ्या अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु पुण्यातील नामांकीत शिक्षणसंस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post