भारतीय सैनिकांसाठी पाठवलेल्या फराळाने सैनिकांचे तोंड गोड केले.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : पाञ्चजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब कट्टा ह्यांनी हाती घेतलेल्या #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली या उपक्रमा अंतर्गत भारतीय सैनिकांसाठी पाठवलेल्या फराळाने सैनिकांचे तोंड गोड केले.

पाञ्चजन्य फाऊंडेशन चे अध्यक्ष सिध्दार्थ राजे , सचिव समीर कुलकर्णी व संस्थापक सभासद रश्मीन कुलकर्णी ....प्रवर्तन फाऊंडेशन चे योगेश जोशी , निनाद पटवर्धन व रावसाहेब कट्ट्याचे प्रसाद ठोसर व इतर मित्र परिवार प्रसाद जोशी , मकरंद जोशी ,गौतम गोवित्रिकर ह्यांनी काही दिवसांपूर्वीच हा फराळ पुण्याहून सैनिकांसाठी पाठवला होता.


आमचे सहयोगी योगेश जोशी आणि निनाद पटवर्धन हे दोघेही दिवाळी फराळ घेऊन सैनिकांना भेटले आणि स्वहस्ते हा फराळ सैनिकांचे तेथील प्रमुखांच्या हाती सपूर्त केला. सुमारे १२०० सैनिकांनी ह्या फराळाचा आस्वाद घेतला. 

हा एक विलक्षण योगायोग होता की , नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननिय एकनाथराव शिंदे व सांस्कृतिक मंत्री माननीय सुधीर राव मुनगंटीवार ह्यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जम्मू काश्मीर मध्ये लोकार्पण केले होते. आणि त्यानंतर लगेचच शिवप्रतापदिनी Machil Valley मध्ये १४८०० फूट Altitude वर छत्रपतींच्या शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात जेव्हा भारतीय सैनिकांबरोबर आम्ही ही दिवाळी साजरी केली. 

ही दिवाळी आम्हा सर्वांच्या आयुष्यातील एक स्वप्नवत अशी दिवाळी आहे. हा योग घडवून आणणारे योगेश जोशी आणि निनाद  पटवर्धन ह्यांचे लाख लाख आभार. ह्या उपक्रमाला योगदान देणाऱ्यांना हीच लाख मोलाची पावती.🙏



अधिक माहितीसाठी

समीर कुलकर्णी

सचिव

पांच्यजन्य फाऊंडेशन

9421612227

9307431722

Post a Comment

Previous Post Next Post