सेनादलामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना असलेल्या सुवर्णसंधी - मार्गदर्शन


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

'कॅप्टन वंजारी अकॅडमी" चेंबूर, मुंबई आणि "श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)", मुंबई ; यांच्या संयुक्तमाने सेनादलाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शनपर सत्र शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर "राजश्री शाहू सभागृह", "श्री शिवाजी मंदिर", दादर ह्या ठिकाणी आयोजित केले आहे ह्या सुवर्णसंधीचा विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक ह्या सर्वांनी जरूर फायदा घ्यावा. 

आज जवळजवळ सेनादलात १२ हजार ते १५ हजार अधिकाऱ्यांची कमतरता आहे त्याचा फायदा विद्यार्थी, आणि विद्यार्थिनींनी जरूर घ्यावा. सेनादलातर्फे आपण एक उत्तम अधिकारी, उत्तम अभियांत्रिकी अधिकारी; वायुदलामध्ये वैमानिक अधिकारी ; नौदलामधे अधिकारी बनता येते . हे सर्व अधिकारी होण्यासाठी एन डी ए , सी डी एस , ऍफकॅट परीक्षेमार्फत ; अभियांत्रिकी , वैद्यकीय , वकील शिक्षणामार्फत आणि एन सी सी मार्फत प्रवेश घेता येतो. हे सर्व प्रशिक्षण विनामूल्य असून एक शाश्वत नोकरी सेनादलात मिळते. एका दगडात आपण तीन पक्षी मारू शकतो देशसेवा, परमार्थ ,स्वार्थ .

Post a Comment

Previous Post Next Post