महावितरणच्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 विजय कांबळे प्रथम ; शिवाजी शिंदे द्वितीय



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले : 

कोल्हापूर: महावितरण कोल्हापूर मंडळाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी दि.०३ नोव्हेंबर रोजी लघु प्रशिक्षण केंद्र, विद्युत भवन, कोल्हापूर येथे संपन्न झाली.या स्पर्धेत श्री.विजय कांबळे यांनी प्रथम, श्री.शिवाजी शिंदे यांनी द्वितीय तर श्री.किरण माळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना अधिक्षक अभियंता मा.अंकुर कावळे, जिल्हा विद्युत निरीक्षक मा.शकील सुतार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना श्री. कावळे यांनी विजेत्यांचे व सहभागी कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन ग्राहक सेवा व स्वतःची सुरक्षा दोन्हीबाबतीत कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असा कानमंत्र  दिला.सदर स्पर्धेसाठी विद्युत सुरक्षा आणि माझी जबाबदारी व महावितरण ग्राहक सेवेतील माझे योगदान हे दोन विषय होते. स्पर्धेत कोल्हापूर मंडळातील २५ बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांनी सहभागी नोंदविला.


कोल्हापूर जिल्ह्याचे विद्युत निरिक्षक शकील सुतार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.याप्रसंगी  व्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.दिपक भोसले, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री.युवराज वाघ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब मुंडे, श्रीमती वासंती भरते, श्रीमती मिनाक्षी अवघडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धा संयोजनासाठी उपकार्यकारी अभियंता श्री. प्रसाद दिवाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शकील महात यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post