चिरनेर अदिवासी महिलाना नवरात्रि आधीच साडी भेट



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर घाटकोपर मुंबई, सतीश सालियन ,राजन देसाई तर्फे चिरनेर अदिवासी महिलांना साडी,भांडी वाटप करण्यात आले हे सर्व साहित्य  आकाश फाऊंडेशन मुंबई च्या सेक्रेटरी संजिवनी  शृंगारे मॅडम तसेच आशा माळी, नम्रता म्हात्रे, याच्या मार्फत सारडे विकास मंच, याच्या कडे सपूर्त करण्यात आले, सदर साहित्याच वाटप आज चिरनेर वाडी वरील आदिवासी महिलाना करण्यात आले . 

सदाबहार दोस्ती ग्रुप तर्फे मुलांना खाऊ वाटप सोबत महिलाना भांडी देऊन नवरात्रीच्या आधीच सुंदर भेट देण्यात आली सतीश सालियान,राजन देसाई याच या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी  सदाबहार दोस्ती ग्रुप चे हरीश म्हात्रे, कामेश्र्वर म्हात्रे,संतोष जोशी,जितेंद्र म्हात्रे,कैलास पाटील,तुकाराम गावंड,सचिन पाटील, सई म्हात्रे, स्नेहित पाटील, नक्ष पाटील, अनूश पाटील याच मोलाचं सहकार्य लाभले चिरनेर वाडी वरील शिक्षक सन्नी बोरसे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सतीश सालीयन आणि राजन देसाई यांचे खास करून आभार व्यक्त केलं की आज सर्व महिलांना नवीन साडी भेट देऊन त्याना आनंद देण्याच काम केले आहे सारडे विकास मंच हा आसा ग्रुप आहे जो सर्वाना दुवा जोडणारा ग्रुप आहे असे मत व्यक्त करत संपूर्ण माहीला वर्ग आणि लहान मुलाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता

सर्व मान्यवरांचे शेवटी सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post