कोल्हापुर जिल्हयात भ्रष्टाचारच्या विरोधात लाचलुचपतच्या विभागा मार्फत जनजागृती

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-भ्रष्टाचारच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागा मार्फत ताराबाई सभागृहात "दक्षता जनजागृती सप्ताह "सुरु करून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बरोबर जीवनाच्या सर्व क्षेत्रात सचोटीने आणि कायद्याचे पालन करून लाच देणार नाही अगर घेणार नाही.अशी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.या वेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे,उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे,प्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर ,नियोजन अधिकारी विजय पवार आणि तहसिलदार स्वप्निल पवार उपस्थित होते.


प्रत्येक वर्षी 30 ऑक्टोबर ते 5नोव्हेंबर जनजागृती सप्ताह साजरा केला जातो.लाचलुचपत विभागाच्या वतीने आय.ई.सी.रथ तयार करून या विभागाकडे तक्रार द्यावी आणि या बाबतीत विचारले जाणारे प्रश्नांची माहिती आणि त्याची उत्तरे देण्यात येऊन हा चित्ररथ कोल्हापुर जिल्हयातील बारा तालुक्यात जत्रा आणि यात्रा गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.त्या गाडीवर जिंगल्सही वाजविल्या जाणार आहेत.तसेच लाचलुचपत विभागाच्या वतीने एफ.एम.रेडिओद्वारे वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना भ्रष्टाचारा बाबत आवाहन केले आहे.लाच प्रकरणी तक्रार देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही.ती माहिती मोबाईल द्वारे मला 9673506555 या नंबरवर माहिती किंवा तक्रार करु शकता असे आवाहन पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांनी केले आहे.या सप्ताहात विद्यार्थांसाठी  निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून बक्षिंसाचे वाटप करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post