अल्पवयीन मुलांच्या वाढ़त्या आत्महत्यामुळे पालकांच्यात घबराट?मनमोकळे पणाने बोलल्यास आत्महत्या थांबतील.

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-अल्पवयीन मुलांच्या वाढ़त्या आत्महत्यामुळे सध्या पालकाच्यांत घबराट पसरली आहे.कुणाला मोबाईल दिला नाही म्हणुन तर कुणी परिक्षेत नापास झाला म्हणून तर कुणी पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या हत्या करीत आहेत.काही जण तर विविध कारणामुळे आत्महत्या करतात.अशा  वेळी आपल्या मुलांच्या लक्षणाकडे लक्ष दिल्यास आणि त्यांच्यावर वेळीच उपाय योजना केल्यास आत्महत्या रोखता येणे शक्य आहे.

काही युवक मित्रांचा दबाव ,गुंडगिरी या सारख्या कारणाने आत्महत्या केली जाते तर काही जण त्यांच्या असलेल्या नशा मुळे हेही कारण असू शकते.आणि काही जण आजाराला कंटाळुन केल्याच्या घटना घडल्या आहेत.अशा वेळी लहान मुलांना आणि तरुणांना त्यांना गप्प बसण्या ऐवजी त्यांना मनमोकळे पणाने बोलण्यास प्रोत्साहन द्यावे.त्यांचा तणाव आणि चिंता कमी करून चांगल्या कामात लक्ष केंद्रित करावे.अशा मुलांचे बोलणे शांत पणे ऐकत ज्यामुळे तुमच्याशी मनमोकळे पणाने आपले विचार सांगू शकतील .त्यांच्या समस्या समजून घेताना आपण स्वीकार केला पाहिजे.त्यांच्या भावनाही समजून घेण्याचा प्रयत्न करावा.गरज पडल्यास अशा मुलांना मानसोपचार डॉक्टरना दाखवून त्यांचाही सल्ला घ्यावा .अशा वेळी त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आधार दिल्यास त्यांचे मत परिवर्तन होऊन होणारया आत्महत्या थांबतील.

Post a Comment

Previous Post Next Post