ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाजातील 70 वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी  : वीरशैव लिंगायत नागरिक बनगार उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी  ची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार  दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता श्री दानम्मा देवी व वीरभद्र मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे व समाजातील बंधू भगिनींचे स्वागत श्री इराण्णा चचडी यांनी केले. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.स्वागत गीत सौ. शालिनी हालभावी यांनी केले.अहवाल सालत मृत्यू पावलेल्या  समाजबांधवांची श्रद्धांजली  वाहिन्या आले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिवकुमार मुरतले सरांनी करून दिले.व वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या सिव्हिल बोर्ड चे अध्यक्ष मा.श्री इरगोंड (दादा) पाटील यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष इराण्णा मट्टीकल्ली यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाची प्रास्ताविक शिवकुमार मूरतले सरांनी केले.

सन 2022-23 या सालाचे अहवाल वाचन श्री शंकर बिळ्ळूर यांनी केले.सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

समाजातील दहावी-बारावी व इतर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सर्वांचा  सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर आपल्या समाजातील 70 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा  सत्कार वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या सिव्हिल बोर्डचे अध्यक्ष इरगोंड दादा पाटील व  मंडळाच्या सर्व संचालक व व महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.मान्यवरांचे मनोगत मध्ये इराण्णा मट्टीकल्ली यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण मा. श्री. इरगोंदा (दादा) पाटील यांनी समाजाच्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केले.  असेच नवनवीन उपक्रम समाजा मध्ये करत रहावे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन केले. उत्कर्ष मंडळाचे कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.आभार सौ.प्रिया प्रकाश वरदाई यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राखी मुरतले यांनी केले. हा सर्व कार्यक्रम संपन्न करण्यासाठी श्री इराण्णा मट्टीकल्ली, प्रकाश वरदाई, प्रमोद हलभावी, शंकर बिळ्ळूर, सुभाष घुणकी, महेश कब्बूर, राजू भावीकट्टी, इराण्णा चचडी, वज्रकांत कोळकी, शिवकुमार मुरतले, आनंद हेरलगे, राजू हारूगेरी, रमेश कराडकर, मनोज चचडी, अनिल चचडी, श्रीशैल बिल्लूर, संतोष हारूगेरी, सुनील चचडी, इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केला.

Post a Comment

Previous Post Next Post